Sambhajinagar Crime News : मासे विक्रीच्या वादातून हत्या प्रकरण : फरार दोघांना बेड्या

आतापर्यंत तीन आरोपींना अटक; २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी; जिन्सी पोलिसांची कारवाई
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : मासे विक्रीच्या वादातून हत्या प्रकरण : फरार दोघांना बेड्याFile Photo
Published on
Updated on

Murder case stemming from fish-selling dispute: Two absconding suspects arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुना बायजीपुरा भागात मासे विक्रीचे दुकान लावण्याच्या किरकोळ वादातून शाहरुख शकील खान (३०) या तरुणाची हॉकी स्टिकने डोके फोडून हत्या केल्याच्या प्रकरणात फरार दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात जिन्सी पोलिसांना अखेर यश आले. दोघे राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना शरणापूर फाटा येथून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Sambhajinagar Crime News
Nanded Robbery | उमरखेड घरफोडीचा छडा: हैदराबाद येथून दोघांना अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

माजिद शफी खान (२७, रा. रहिमनगर) आणि मोहम्मद अक्रम अब्दुल रहेमान (२७, रा. चिश्तिया कॉलनी, सिडको) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी गुरुवारी (दि.१८) दिली. तर समीर शरीफ शहा (१९, रा. रहीमनगर) याला बुधवारीच अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बायजीपुरा परिसरातील गंजेशहिदा मशिदीजवळ ६ जून रोजी मासे विक्रीच्या वादातून शाहरुख आणि घटनेनंतर घाटी निर्माण झाला होता. नातेवाईकांनी आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह त्याचे काका युसूफ खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. गंभीर जखमी झालेल्या शाहरुखचा १५ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णालयात मोठा जमाव जमून तणाव ताब्यात घेण्यास नकार दिला होता. शाहरुखच्या मृत्यूनंतर जिन्सी पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून तपासाची चक्रे फिरवली.

Sambhajinagar Crime News
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि इतर आरोपींची ओळख पटवली. मुख्य आरोपी माजिद खान आणि मोहम्मद अक्रम हे शरणापूर फाटा येथे लपून बसले असून ते राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे यांच्या पथकाने तात्काळ धाव घेत दोघांना अटक केली.

कोठडी सुनावली. ही धडक कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, परिमंडळ-२ चे उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास सहायक निरीक्षक अरुणा घुले करत आहेत. न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news