Bribe Case : बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रासाठी लाच घेणारा मनपा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रासाठी लाच घेणारा मनपा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत कामगारांची नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
Bribe Case
Bribe Casepudhari photo
Published on
Updated on

Municipal Employee Caught by ACB for Accepting Bribe for Construction Workers' Certificates

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत कामगारांची नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या (झोन क्र. ६) एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवार (दि.२) रंगेहाथ पकडले. रूपचंद धरमचंद बनकर (४७) असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मनपात पाणीपुरवठा वसुली मजूर (वर्ग ४) म्हणून कार्यरत आहे.

Bribe Case
Sambhajinagar Crime : वैजापूरमध्ये जलसंधारण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदार हे महाराष्ट्र युवा शक्ती श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते संघटनेच्या माध्यमातून कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्यांच्याकडे ५० बांधकाम कामगार नोंदणीसाठी आले होते. या ऑनलाइन नोंदणीसाठी महापालिकेमार्फत बांधकाम कामगाराने मागील वर्षात ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी मनपाच्या झोन क्रमांक ६ मध्ये संपर्क साधला असता, रूपचंद बनकर याने एका प्रमाणपत्रासाठी ५५० रुपये याप्रमाणे ५० कामगारांच्या प्रमाणपत्रांसाठी एकूण २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही कोणतीही शासकीय फी नसून लाच असल्याचे लक्षात आल्याने, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने मनपाच्या झोन क्र. ६ परिसरात सापळा रचून २७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रूपचंद बनकर याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

Bribe Case
Purna Construction Workers | पुर्णेत नुतनीकरणासाठी बांधकाम मजुरांचे हेलपाटे; वर्षभरापासून प्रकरणे प्रलंबित

याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजीव तळेकर, संगिता एस. पाटील, हवालदार सचिन बारसे, रामेश्वर गोरे, दीपक इंगळे, रामेश्वर ताटे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news