Property Tax : थकबाकीदारांच्या शोधासाठी मनपाची विशेष मोहीम

पाच वर्षांत एकदाच भरला कर, ६० हजार मालमत्ताधारक रडारवर : शास्तीवर १०० टक्के माफीची योजना
Sambhajinagar News
Property Tax : थकबाकीदारांच्या शोधासाठी मनपाची विशेष मोहीमfile photo
Published on: 
Updated on: 

Municipal Corporation’s special drive to locate defaulters

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने आता , थकबाकीदारांचा शोध घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. न गेल्या पाच वर्षांत एकदाच मालमत्ता , कर भरलेल्या सुमारे ६० हजार ■ी मालमत्ताधारकांचा शोध घेतला 1. जाणार आहे. याशिवाय दहा न वर्षांपूर्वी कर भरल्यानंतर पुन्हा कर कन भरणाऱ्या मालमत्ताधारकांचीही न माहिती संकलित केली जात आहे.

Sambhajinagar News
Waluj News : अहिल्यानगर महामार्गावर सांडपाण्याचे तळे

अशा मालमत्ताधारकांना मेसेज, व दूरध्वनी आणि प्रत्यक्ष नोटिसांच्या माध्यमातून कर भरण्यास न प्रोत्साहीत केले जाणार आहे. ने डिसेंबरअखेरपर्यंत लागू असलेल्या १०० टक्के शास्तीमाफी योजनेचा लाभ घेऊन मूळ कर भरावा, यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहेत.

महापालिकेच्या व्यावसायिक कोट्यवधी रेकॉर्डवर शहरातील तीन लाख ४२ हजार मालमत्ता नोंदणीकृत आहेत. यातील काही नवीन, तर काही जुन्या निवासी आणि मालमत्ताधारकांकडे रुपयांचा कर थकीत आहे. दरम्यान महापौर समीर राजूरकर यांनी सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या १०० टक्के शास्तीमाफी योजनेचा लाभ अधिकाधिक थकबाकीदारांना मिळावा, यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

महापालिकेच्या तीनगर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांच्या याद्या तयार करून त्या संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडे सोपविल्या आहेत. सुमारे एक लाख ६० हजार मालमत्ताधारकांचा या मोहिमेत समावेश आहे. यातील काही मालमत्ताधारकांनी गेल्या पाच वर्षांत एकदाच कर भरला आहे, तर काहींनी दहा वर्षांपूर्वी कर भरल्यानंतर पुन्हा कर भरण्याकडे पाठ फिरविली आहे.

Sambhajinagar News
Fraud Case : मुलीच्या शिक्षणासाठी उसने घेतलेले ७ लाख बुडवून डॉक्टरला गंडा

अशा मालमत्ताधारकांचा शोध घेऊन त्यांना मेसेज, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष नोटिसांच्या माध्यमातून कर भरण्यास प्रोत्साहीत केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एक लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या ११०९ मालमत्ताधारकांकडे सुमारे २७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांसाठी स्वतंत्र नोटीस नमुना तयार करण्यात आला आहे.

संबंधितांना नोटिसा बजावून वसुलीचा तगादा लावण्यात येणार आहे. दुसरीकडे, गेल्या पाच वर्षांत किमान एकदा तरी कर भरलेल्या. मात्र एक लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या सुमारे ५९ हजार मालमत्ताधारकांनाही संदेश आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.