Sambhajinagar News : मनपाची ४५० कोटींची विक्रमी वसुली

कर वसुलीत ऐतिहासिक यश, नगररचना, गुंठेवारीत पाडापाडीनंतरही अपयशच
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : मनपाची ४५० कोटींची विक्रमी वसुलीFile Photo
Published on
Updated on

Municipal Corporation's Record Recovery of ₹450 Crores

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत ऐतिहासिक यश मिळाले आहे. मागील ३८ वर्षांत प्रशासनाला तब्बल २३३ कोटी ५५ लाखांचा कर वसुली करण्यात यश आले. तसेच महापालिकांच्या मालमत्तातूनही तिज-ोरीत १३ कोटी १० लाखांची भर पडली. मात्र नगररचना आणि गुंठेवारी विभागाला उद्दिष्टही गाठता आले नाही. बेकायदा बांधकामे पाडूनही गुंठेवारीच्या उद्दिष्टापेक्षा २ कोटींचेच उत्पन्न वाढले. तर बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रातून ३०० कोटींचे उद्दिष्ट असताना १२४ कोटी रुपयांचेच उत्पन्न प्राप्त झाले.

Chhatrapati Sambhajinagar
९ कोटींच्या करासाठी ७१ मालमत्ता सील

महापालिका आयुक्त जी. श्रीकांत मागील तीन वर्षांपासून मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि नगररचना, गुंठेवारीतून तिजोरीत भर पडावी, यासाठी पाठपुरावा करीत आहेत. सतत अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नवनवे प्रयोग करीत आहेत. कराच्या वसुलीकडे विशेष लक्ष देत त्यांनी यंदा सलग दोन महिने शास्ती से आझादी, शास्तीतून मुक्ती उपक्रम राबवून वसूली वाढीसाठी यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयोगाला करमूल्य निर्धारक व संकलक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनीही तेवढ्याच गांभीर्याने मोहीम राबवत प्रत्यक्षात वसुलीचा आकडा वाढविला. याच प्रयत्नामुळे यंदा मालमत्ता कराची ऐतिहासिक वसुली करण्यात महापालिकेला यश आले.

महापालिकेला आजपर्यंत २०० कोटींचा आकडाही पार करता आला नाही. परंतु यंदा प्रशासनाने डिसेंबरमध्येच २०० कोटी रुपये कर वसुलीचा टप्पा गाठला. महापालिका निवडणुकीमुळे वसुली मंदावली होती. तरीही ३१ मार्चपर्यंत मालमत्ता करातून २११ कोटी १५ लाख २९ हजार तर पाणीपट्टीतून २२ कोटी ४० लाख ४० हजार असे एकूण २३३ कोटींची वसुली करण्यात यश आले.

Chhatrapati Sambhajinagar
मनपाचा अर्थसंकल्प यंदाही ३२०० कोटींवर जाणार

परंतु त्यातुलनेत नगररचना विभागाला सपशेल अपयशच आले. अर्थसंकल्पात या विभागाला वर्षभरात ३०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. परंतु त्या तुलनेत १२४ कोटींचेच उत्पन्न मिळाले. मोठ्याप्रमाणात भोगवटा प्रमाणपत्रांची प्रकरणे प्रलंबित आहेत. शहरात मोठमोठी बांधकामेही सुरू आहेत. तरीही उद्दिष्ट गाठण्यात अपयशच आले आहे.

मालमत्तांपासून वाढीव उत्पन्न

महापालिकेच्या मालमत्ता विभागानेही यावर्षी वसुलीचा विक्रम केला. शहरातील ४८८ गाळ्यांचे भाडे, हॉलचे भाडे आणि लिजवर दिलेल्या पडीक जमिनीच्या भाड्यापोटी १३.१० कोटी वसूल झाले. मालमत्ता विभागाच्या उपायुक्त अपर्णा थेटे आणि सहायक आयुक्त संजय चामले यांनी यंदा भाडे कराराचे नूतनीकरण करून विशेष प्रयत्न करीत उत्पन्न वाढविले.

पाडापाडीनंतरही गुंठेवारीतून ७७ कोटीच

शहरात रस्त्यालगत वर्षानुवर्षांपासून असलेली शेकडो वेकायदा बांधकामे महापालिकेच्या पथकाने पाडली. यात गावठाणमध्ये असलेल्या मालमत्ताही जमीनदोस्त केल्या. तरीही यंदा गुंठेव- ारीतून केवळ उद्दिष्ट गाठण्याएवढेच म्हणजेच ७७ कोटी रुपयांचेच उत्पन्न महापालिकेला मिळू शकले. जेव्हा की, २०२१-२२ मध्ये पाडापाडी न करता महापालिकेच्या तिजोरीत गुंठेवारीतून १२५ कोटी रुपये जमा झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news