९ कोटींच्या करासाठी ७१ मालमत्ता सील

मनपाचे मिशन मार्चएण्ड, २२१ कोटी रुपयांची वसुली
chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेटPudhari News Network
Published on
Updated on

71 properties sealed for tax of Rs 9 crore

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने सलग दोन महिने शास्तीवर सवलत देत यंदा तब्बल २०० कोटी रुपये कर वसुलीचा टप्पा गाठला आहे. आता कर वसुलीचे मिशन मार्चएण्ड अंतिम टप्प्यात असून, २४ दिवसांत तब्बल २१ कोटी रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर थकीत ९ कोटी २२ लाख रुपयांच्या करापोटी ७१ मालमत्ता महापालिकेने सील केल्या आहेत.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
सिडकोचे प्रशासक मिनियार सर्वात श्रीमंत !

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कर वसुलीत यंदा विक्रमी कामगिरी करीत १ एप्रिल २०२५ ते २५ मार्च २०२६ या ११ महिने २५ दिवसांत २२१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यात मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपये तसेच पाणीपट्टीपोटी २१ कोटी रुपयांचा समावेश आहे.

आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली कर मूल्यनिर्धारक व संकलन विभागाचे उपायुक्त विकास नवाळे, कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली. यंदा महपालिका निवडणूकही आल्याने त्यात तब्बल तीन महिने कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
मनपा उत्पन्न वाढीसाठी कर वसुलीवर भर देणार

याबाबत महापालिकेचे उपायुक्त नवाळे यांनी सांगितले की, महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूक्ष्म नियोजन व प्रभावी मार्गदर्शनामुळे ही विक्रमी वसुली शक्य झाली आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत ४५ टक्क्यांहून अधिकप्रमाणात कर वसुलीत वाढ झाली आहे. तब्बल ३५ टक्के नागरिकांनी अधिक कर भरलेला आहे. तसेच व्हॉट्सअॅप चॅटबॉट व ऑनलाईन कर भरण्याची सुविधा, श्रीमित्र कक्ष आणि श्रीमित्र अॅप यांच्या माध्यमातून अधिकाधिक करदात्यांपर्यंत पोहोचणे प्रशासनाला शक्य झाले. त्यामुळे कर वसुलीचा आकडा वाढल्याचे दिसत आहे, असे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news