Sambhajinagar News : इंधन बचतीसाठी मनपा वापरणार ईव्ही कार

एका गाडीतून ३ अधिकारी येणार कार्यालयात; पेट्रोल-डिझेल वापर कमी करणार
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : इंधन बचतीसाठी मनपा वापरणार ईव्ही कारFile Photo
Published on
Updated on

Municipal Corporation to Use EV Cars for Fuel Savings

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने इंधन बचतीसाठी आता पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एका ईव्ही कारमधून किमान ३ अधिकाऱ्यांनी एकत्रित कार्यालयात यावे, साईटवर पाहणीसाठी जावे, त्यासोबतच शक्य तेवढ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शहर बसचा वापर करावा, असे आदेश सोमवारी (दि. १८) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी जारी केले.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar | प्लास्टिकवर मनपाचा दुहेरी प्रहार

त्यासोबतच पेट्रोल डिझेलवरील चारचाकी वाहने आवश्यकतेनुसारच निर्देशही त्यांनी दिले. वापरण्याचे अमेरिका-इराण युद्धाने अनेक देशांमध्ये इंधन संकट वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने पेट्रोल डिझेलवरील चारचाकी वाहनांचा वापर मोठ्याप्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेथे एक चारचाकी एकच अधिकारी वापरात होते. तेथे आता एकाच जास्तीतजास्त वाहनातून अधिकाऱ्यांनी येजा करावी, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासंदर्भात सोमवारी आयुक्त येडगे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आदेश जारी केले.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : मोती कारंजा ते समर्थनगर नाल्यांची सभापतींकडून पाहणी

त्यात महापालिकेकडे असलेल्या ७इलेक्ट्रिक कार प्रमुख २१ अधिकाऱ्यांनी वापरण्याचे आदेशात नमूद केले आहे. तर इतर सहा अधिकाऱ्यांसाठी दोन बोलेरो जीप देण्यात आल्या आहेत. याबाबत आयुक्त येडगे म्हणाले की, महापालिकेच्या शक्य तेवढ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आवश्यक आहे. तशी सूचना देखील प्रत्येकांना केली आहे. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या ईव्ही कार या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एका कारमधून किमान तीन अधिकारी कार्यालयात येतील, असेही सांगण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news