

Municipal Corporation deploys a fleet of 50 vehicles for the collection of ritual offerings (Nirmalya)
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकले जाऊ नये, यासाठी महापालिकेने यंदा व्यापक संकलन व्यवस्था उभी केली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सहा विशेष गाड्यांमधून निर्माल्य संकलित केले जाणार असून, गणेश विसर्जनाच्या दिवशी तब्बल ५० गाड्या सेवेत असतील. याशिवाय शहरातील विहिरी आणि कृत्रिम विसर्जन तलावांच्या परिसरात ६० निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही व्यवस्था केली आहे. नागरिकांकडून संकलित होणारे हार, फुले आणि अन्य निर्माल्य हर्मूल येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येईल. तेथे निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. हे खत आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा उपक्रमात सहभागी झालेल्या गणेश मंडळांना देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य नदी, नाले, विहिरी अथवा अन्य जलस्रोतांमध्ये टाकल्यास जलप्रदूषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य थेट पाण्यात न टाकता जवळच्या निर्माल्य कलशात जमा करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नियोजनातून ही संकलन व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
अशी असेल व्यवस्था
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत निर्माल्य संकलनासाठी, ६ गाड्या
गणेश विसर्जनाच्या दिवशी, ५० गाड्या
निर्माल्य कलश- विहिरी व कृत्रिम विसर्जन तलावांजवळ, ६० गाड्या
निर्माल्यावर हसूल प्रक्रिया केंद्रात शास्त्रोक्त प्रक्रिया
सहभागी गणेश मंडळांना सेंद्रिय खताचे