Sambhajinagar News : एमआयएमच्या मागणीला भाजप-शिवसेनेचा पाठिंबा : महिला नगरसेविकांच्या उपस्थितीचा मांडला मुद्दा

गौरी सणाच्या पार्श्वभूमीवर महिला नगरसेविकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे अडचणीचे ठरू शकते, असा मुद्दा उपस्थित करीत एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी शुक्रवारी (दि.१८) सभा तहकूब करण्याची मागणी केली.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : एमआयएमच्या मागणीला भाजप-शिवसेनेचा पाठिंबा : महिला नगरसेविकांच्या उपस्थितीचा मांडला मुद्दाfile photo
Published on
Updated on

BJP-Shiv Sena support MIM's demand: Issue of presence of women corporators raised

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गौरी सणाच्या पार्श्वभूमीवर महिला नगरसेविकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे अडचणीचे ठरू शकते, असा मुद्दा उपस्थित करीत एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी शुक्रवारी (दि.१८) सभा तहकूब करण्याची मागणी केली. या मागणीला भाजपचे नगरसेवक राजू वैद्य यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सभागृहनेते गोविंद केंद्रे आणि शिवसेनेचे गटनेते किशोर नागरे यांनीही समर्थन दिल्याने महापौर समीर राजूरकर यांनी सभा तहकूब केली.

Sambhajinagar News
Municipal contract workers salary delayed : तब्बल दोन महिन्यांपासून रखडले मनपा कंत्राटी कामगारांचे वेतन

महापालिकेत साडेपाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. ३३ नगरसेवकांसह एमआयएम विरोधी बाकावर आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत असताना शुक्रवारी सभागृहात वेगळे चित्र दिसले. महापौर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभा सुरू झाली. प्रारंभीच समीर साजिद यांनी गणेशोत्सव सुरू असून शुक्रवारी गौरी सण असल्याचे निदर्शनास आणून दिले.

घरोघरी गौरी पूजन तसेच प्रसादाचे आयोजन असल्याने महिला नगरसेविकांना सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सभा तहकूब करून पुढील तारीख निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. समीर साजिद यांच्या मागणीवर भाजपचे नगरसेवक राजू वैद्य यांनी एमआयएमच्या भूमिकेचे कौतुक केले. एमआयएमला हिंदू सणाबद्दल जिव्हाळा असल्याचे त्यांनी सांगत तहकुबीच्या मागणीला समर्थन दिले.

यानंतर गोविंद केंद्रे आणि किशोर नागरे यांनीही समान भूमिका घेतली. अखेर महापौरांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गौरी सणाचे कारण देत एमआयएमने मांडलेली सभा तहकुबीची मागणी आणि त्याला भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला पाठिंबा यामुळे महापालिका वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : बदल्यांवरून महापालिकेत पदाधिकारी - प्रशासनात मतभेद ?

विरोधकांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांची साथ

सभागृहात यापूर्वी विविध मुद्द्यांवरून एमआयएम आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद दिसून आले आहेत. मात्र, शुक्रवारी गौरी सणामुळे महिला नगरसेविकांच्या उपस्थितीचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एमआयएमच्या सभा तहकुबीच्या मागणीला राजू वैद्य यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर गोविंद केंद्रे आणि किशोर नागरे यांनीही समर्थन दिल्याने महापौरांनी सभा तहकूब.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news