Sambhajinagar News : गुंठेवारीच्या फायलींसह महसुलाचा महापौरांकडून आढावा

शुल्काबाबतही घेतली माहिती : नागरिकांच्या तक्रारींवर अधिकाऱ्यांना विचारणा
Chhatrapati Sambhajinagar bus service
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

Mayor reviews revenue matters, including Gunthewari files

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेला वेग आल्याने महापालिकेच्या गुंठेवारी विभागात वाढलेल्या फायली आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा शुक्रवारी (दि.१८) महापौर समीर राजूरकर यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर त्यांनी अचानक गुंठेवारी विभागात धडक देत तब्बल दीड तास अधिकाऱ्यांकडून विविध बाबींची माहिती जाणून घेतली.

Chhatrapati Sambhajinagar bus service
Sambhajinagar News : बदल्यांवरून महापालिकेत पदाधिकारी - प्रशासनात मतभेद ?

शहरातील अनधिकृत वसाहतींचा गुंठेवारीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेने नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी मोठी सवलत जाहीर करण्यात आली असून, अनधिकृत प्लॉटिंगविरोधातही कारवाई सुरू आहे. परिणामी गुंठेवारी विभागात दाखल होणाऱ्या फायलींची संख्या वाढली असून, महापालिकेच्या उत्पन्नातही कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे.

या पार्श्वभूमीवर महापौरांनी अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत दाखल झालेल्या गुंठेवारी फायलींची संख्या, त्यातून महापालिकेला मिळालेला महसूल आणि नियमितीकरणाच्या प्रक्रियेची सद्यस्थिती जाणून घेतली. गुंठेवारीच्या फायली वास्तुविशारदांमार्फत दाखल होत असल्याने त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचीही त्यांनी माहिती घेतली.

तसेच काही वास्तुविशारद नागरिकांकडून जादा शुल्क घेत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एका फाईलसाठी वास्तुविशारदांकडून किती शुल्क आकारले जाते, नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाते का, यासह महापालिकेच्या पॅनेलवरील वास्तुविशारदांशी अधिकारी नियमित संवाद साधतात का, याबाबतही राजूरकर यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.

Chhatrapati Sambhajinagar bus service
Gunthewari : गुंठेवारी सवलतीला आणखी दोन महिने मुदतवाढ द्या !

प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक

गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी, प्राप्त तक्रारी आणि वास्तुविशारदांकडून आकारण्यात येणारे शुल्क यावर प्रशासनाचे नियंत्रण राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व बाबींची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news