Accident News : मिक्सरच्या चाकाखाली सापडलेल्या तरुणाचा मृत्यू; ईएसआयसी रुग्णालयासमोरील घटना

जखमीला तातडीने तेथे उपचार मिळण्याऐवजी अॅम्ब्युलन्समधून घाटी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला.
Accident News
मिक्सरच्या चाकाखाली सापडलेल्या तरुणाचा मृत्यू; ईएसआयसी रुग्णालयासमोरील घटनाfile photo
Published on
Updated on

Death of a youth found under the wheels of a mixer; Incident in front of ESIC Hospital

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण रस्त्यावर विव्हळत होता. घटनास्थळाच्या अगदी बाजूलाच ईएसआयसी रुग्णालय होते. मात्र, जखमीला तातडीने तेथे उपचार मिळण्याऐवजी अॅम्ब्युलन्समधून घाटी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला. दरम्यान, मिक्सरच्या चाकाखाली सापडलेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

Accident News
Mukutban-Gadchandur railway line : मुकुटबन-गडचांदूर नवीन रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

ही घटना शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत ईएसआयसी रुग्णालयासमोर घडली. शेख तौसिफ अहमद शेख निहाल अहमद (३४, रा. शरीफ कॉलनी, कटकट गेट) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तौसिफ हे दर्गावाली मशिदीत नमाज पठण करून घरी परतत होते. घरी जाण्यासाठी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. दुचाकीस्वार काही अंतर जाताच पाठीमागून भरधाव आलेल्या सिमेंट मिक्सरने (एमएच-०४-जीआर-१२२९) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेने तौसिफ रस्त्यावर कोसळले आणि मिक्सरच्या मागील चाकाखाली सापडले. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना घाटी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

Accident News
MD Drugs Seized : प्रॉपर्टी डीलर बनला ड्रग्ज सप्लायर; अडीच लाखांचे एमडी जप्त

रुग्णालय समोर, तरी घाटीपर्यंत धाव

अपघाताच्या ठिकाणापासून अगदी जवळच महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे रुग्णालय आहे. गंभीर जखमी तौसिफ यांना तेथे दाखल करून प्राथमिक उपचार न देता रुग्णालयाची अॅम्ब्युलन्सने त्यांना थेट घाटी रुग्णालयात नेले. त्यामुळे कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयाच्या या धोरणामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सीसीटीव्हीचा ब्लॅक स्पॉट

ईएसआयसी रुग्णालयाच्या परिसरात आयटी कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापना असूनही रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. एका हॉटेलचा अपवाद वगळता अपघाताचे दृश्य टिपणारा कॅमेरा उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी प्रत्यक्षदर्शीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news