Mukutban-Gadchandur railway line : मुकुटबन-गडचांदूर नवीन रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील कोळसा, सिमेंट मालवाहतुकीला मिळणार गती
Mukutban-Gadchandur railway line
Mukutban-Gadchandur railway line : मुकुटबन-गडचांदूर नवीन रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूरfile photo
Published on
Updated on

Funds of ₹493 crore sanctioned for the new Mukutban-Gadchandur railway line

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुटबन (आदिलाबाद) ते गडचांदूर दरम्यान ३८.२१ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. हा मार्ग छत्रपती संभाजीनगरला कोळसा, सिमेंट आणि अन्य औद्योगिक मालवाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Mukutban-Gadchandur railway line
Bidkin DMIC : बिडकीन डीएमआयसीच्या भूसंपादनावर २८०० आक्षेप

नव्या मार्गामुळे मुकुटबन-गडचांदूर परिसरातील औद्योगिक वाहतूक नांदेड मार्गाशी जोडली जाणार असून, त्याचा थेट फायदा जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरकडे होणाऱ्या मालवाहतुकीला होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

मुकुटबन आणि गडचांदूर परिसरात कोळसा खाणी, सिमेंट प्रकल्प आणि चुनखडीच्या खाणी आहेत. या भागातून निर्माण होणाऱ्या मालाची वाहतूक नव्या रेल्वेमार्गामुळे अधिक कार्यक्षम होणार आहे. विशेषतः कोळसा व सिमेंटची वाहतूक जालना-परभणी-छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या मार्गामुळे या ठिकाणांपर्यंत माल पोहोच करण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे.

Mukutban-Gadchandur railway line
Cyber Fraud : व्हॉट्सॲप डीपीवर मालकाच्या मुलीचा फोटो : एका मेसेजमुळे कंपनीने गमावले ३ कोटी ७० लाख !

उद्योगांसाठी रेल्वेचा पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील उद्योगांसाठी कच्चा माल व तयार मालाची वाहतूक महत्त्वाची आहे. नव्या रेल्वेमार्गामुळे विद्यमान रेल्वे नेटवर्कला अतिरिक्त पर्याय मिळणार असून, वर्धा-माणिकगड मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे औद्योगिक मालवाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

६० लाख टन मालवाहतुकीची क्षमता

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी ६.०८ दशलक्ष टन म्हणजेच सुमारे ६०.८ लाख टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. यामध्ये कोळसा व कोक, सिमेंट, स्पंज आयर्न, लोखंड-स्टील, मेटल स्क्रॅप, खते आणि खाद्यान्न यांचा समावेश असेल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील औद्योगिक व व्यावसायिक वाहतुकीला या नव्या कॉरिडॉरचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news