Crime News : खुनाच्या गुन्ह्यांत फरार मुजीब डॉनसह भावाला बेड्या

गुन्हे शाखेची कारवाई; दोघांवरही खुनाचे गुन्हे
Crime News
Crime News : खुनाच्या गुन्ह्यांत फरार मुजीब डॉनसह भावाला बेड्याfile photo
Published on
Updated on

Mujeeb Don, absconding in murder cases, along with his brother, arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलिसांना वेगवेगळ्या खुनाच्या गुन्ह्यांत हव्या असलेल्या दोन सख्ख्या आरोपी मुजीब डॉन आरोपी सय्यद मोसीन भावांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी अटक केली आहे. पडेगाव भागातील अन्सार कॉलनीतून या दोघांना सोमवारी (दि. ७) जेरबंद करण्यात आले.

Crime News
Sambhajinagar News : हातातील लोखंडी कड्याने तिघांना मारहाण

सय्यद मुजीब सय्यद मोईनोद्दीन ऊर्फ मुजीब डॉन (४५) आणि त्याचा भाऊ सय्यद मोसीन सय्यद मोईनोद्दीन (३८, दोघे, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेला सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सय्यद मोसीन हा पडेगाव येथील अन्सार कॉलनी (पॉवर हाऊसजवळ) येथे स्वतःच्या घरी आल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पथकाने थेट आरोपीच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात एका रूममध्ये दोन जण बसलेले पोलिसांना आढळले. आरोपी सय्यद मोसीन हा २ ऑक्टोबर २०२५ रोजी सादातनगर रेल्वे ब्रिजखाली सय्यद इमरान याच्या निघृण हत्येच्या गुन्ह्यात फरार आरोपी होता. तर मोसीनसोबत असलेला त्याचा दुसरा भाऊ सय्यद मुजीब ऊर्फ मुजीब डॉन याला त्याच वेळी साताऱ्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती.

तो नंतर जमिनीवर बाहेर आला होता. दरम्यान त्यानंतर मुजीब डॉन हा २१ जुलै २०२६ रोजी रांजणगाव पोळ (ता. गंगापूर) येथे घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता. त्याला शिल्लेगाव पोलिस तेव्हापासून शोधात होते. गुन्हे शाखेने या दोन्ही फरार भावांना ताब्यात घेऊन त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सातारा पोलिस ठाणे (शहर) आणि शिल्लेगाव पोलिस ठाणे (ग्रामीण) यांच्या स्वाधीन केले आहे.

Crime News
Sambhajinagar News : मनपाच्या अतिक्रमण पथकाची व्हॉट्सॲपवर टीप

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, उपनिरीक्षक अर्जुन कदम, राजेंद्र साळुंके, संतोष पारधे, संदीप तायडे, कैलास काकड, श्रीकांत काळे, मनोज विखनकर, विजय निकम, मनोहर गीते, शिल्पा तेलोरे, पूनम पारधी आर्दीच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news