kidney donation : आईच्या किडनीदानाने तरुण मुलास नवे जीवन

गंभीर आजारातून सुटका, यशस्वी किडनी प्रत्यारोपण
Mother's kidney donat her young boy
kidney donation : आईच्या किडनीदानाने तरुण मुलास नवे जीवनPudhari
Published on
Updated on

Mother's kidney donation gives young boy new life

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आईचे आपल्या मुलावरील निस्वार्थ प्रेमाचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. ६४ वर्षीय आईने आपल्या ३१ वर्षीय मुलास स्वतःची किडनी देऊन नवे जीवन दिले आहे. किडनी प्रत्यारोप-णाची ही यशस्वी शस्त्रक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल येथे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल रुईकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पार पडली.

Mother's kidney donat her young boy
American Pitbull : अमेरिकन पिटबुलची हत्या; तिघांवर गुन्हा

किडनी निकामी होण्याच्या गंभीर आजाराने हा तरुण त्रस्त होता. त्यास तीव्र अशक्तपणा, मळमळ आणि युरेमियाची लक्षणे जाणवत होती. त्याच्या आरोग्य तपासणीनंतर किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णाची ६४ वर्षीय आई स्वतः पुढे येत मुलाचे प्राण वाचवण्यासाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

कमी शिक्षण असूनही संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी मोठा आत्मविश्वास आणि धैर्य दाखवले. रुग्णाला योग्य उपचारानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी नेफ्रॉलॉजी विभागप्रमुख डॉ. सचिन सोनी व सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच सर्जन, अॅनेस्थेटिस्ट आणि नर्सिंग स्टाफ यांच्या टीमवर्कचे कौतुक करण्यात आले.

Mother's kidney donat her young boy
Sambhajinagar News : शहराची तहान भागवण्यासाठी मनपाची धडपड

आईच्या त्यागाचे मोठेपण

या किडनी प्रत्यारोपणानंतर डॉ. रुईकर म्हणाले, अंतिम टप्प्यातील किडनी विकार असलेल्या रुग्णांसाठी किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार आहे. या घटनेमुळे आईच्या त्यागाचे मोठेपण आणि समाजात अवयवदानाबाबत जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news