'आमदारकी गेली तरी चालेल'; आमदार बोरनारे असे का म्हणाले...

वैजापूर येथील मेळाव्यात आमदार रमेश बोरणारेंचे विधान
MLA Ramesh Borunare statement
आमदार रमेश बोरणारे
Published on
Updated on

वैजापूर : मी रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त आहे. त्यांच्यासाठी माझी आमदार की गेली तरी चालेल, असं वक्तव्य आमदार रमेश बोरनारे यांनी शनिवारी (दि.२८) केले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघात रामगिरी महाराजांचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

MLA Ramesh Borunare statement
आनंद दिघेंना मारलं गेलं, अख्खा ठाणे जिल्हा जाणतो - आमदार शिरसाट

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महंत रामगिरी महाराजांनी एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सप्ताहला भेट दिल्याने विरोधक आक्रमक झाले होते. या व्हिडिओमुळे राज्यात सर्वात आधी वैजापूर शहरामध्ये त्याचे पडसाद उमटले होते. तसेच मुख्य चौकामध्ये मोठा जमाव जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. रामगिरी महाराजांवर  राज्यात पहिला गुन्हा देखिल वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या घटनेनंतरच महाराजांच्या या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. अन् विरोधकांनी सरकार हे त्यांचे समर्थन करत असल्याची टीका केली होती. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते.

आता तर वैजापूर विधासभा मतदासंघांचे आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूर येथिल कार्यकर्त्यांचे मेळाव्यामध्ये विरोधकांवर टीका करताना "होय मी रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त" त्याच्या साठी आमदार की गेली तरी चालेल, असं वक्तव्य केले आहे. तर विरोधकांवर टीका करताना मैदानात या निवडणूक लढवा, असे बोरणारे म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीत रामगिरी महाराजांचे भांडवल सत्ताधारी व विरोधी पक्षांतील नेत्यांकडून होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाराजांवर गुन्हे दाखल करणारे मातोश्रीवर

या मेळाव्यात बोलताना माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी देखील विरोधकांवरती टीका करताना रामगिरी महाराजांवरती गुन्हे दाखल करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री सत्कार झाल्याचा दावा खान यांनी केला. तसेच हिम्मत असेल तर मैदानात या मग तुम्हाला दाखवून देऊ, असे खान म्हणाले. तसेच तुम्ही किती जातीवाद करत आहत. त्यापेक्षा जास्त जातिवाद आम्ही करू शकतो, असेही खान म्हणाले.

MLA Ramesh Borunare statement
काही लँडमाफियांना सावंतवाडी मतदारसंघाचा आमदार व्हायचं आहे !

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news