काही लँडमाफियांना सावंतवाडी मतदारसंघाचा आमदार व्हायचं आहे !

Sawantwadi News | त्यांचा लवकरच पोलखोल करू : संजू परब यांचा इशारा
Sawantwadi News
पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब. अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर, मोहीनी मडगावकर आदी. Pudhari
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात काही लँडमाफीया धुडगूस घालत आहेत. काहींना आमदार व्हायचे आहे. जनतेच्या जमिनी घेऊन त्या गोरगरिबांचे पैसे ठेवत आहेत. स्वतः ला भविष्यात होणारी अटक टाळण्यासाठी आमदार होण्याची स्वप्न बघत आहेत. अशा लोकांपासून जनतेने सावध रहावे. या लैंडमाफीयाचे नाव व प्रताप भविष्यात पुराव्यासकट व त्या गोरगरिबांना सोबत बसवून जाहीर करेन, असा इशारा भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. सावंतवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भा.ज.पा. शहराध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर, मोहीनी मडगावकर, संजय वरेरकर, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते. श्री. परब म्हणाले, काही दिवस मी गप्प होतो. माझ्या नेत्यांनी तोंडाला आवर घाल असे सांगितले होते. मात्र, आता माझ्या नेत्यांनी आता मला बोलण्याची मुभा दिली आहे.

नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मला मिळाला आहे. त्यामुळे या लैंडमाफीयाचे नाव ज्या गोरगरिबांचे पेमेंट झाली नाहीत म्हणून रडत आहेत, अशांना सोबत घेऊन जाहीर करेन असा प्रहार त्यांनी केला. हे गरीब लोक दोन-दोन वर्षे त्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे यापुढे जनतेने अशांपासुन सावध रहावे, आश्वासनांना बळी पडू नये आजपासून माझी भूमिका स्पष्ट असेल. मी कुणाला घाबरलो नाही व घाबरतही नाही, असा इशारा श्री. परब् यांनी दिला.

दरम्यान, नाव जाहीर न केल्याने भाजपात हे लैंडमाफीया आले किंव असतील तर भूमिका काय? असे विचारले असता संजू परब म्हणाले या लँडमाफीयाला कधीही भाजपचे तिकीट मिळणार नाही. त्यांना काह मिळणार नाही. लवकरच नाव जाहीर करेन, निवडणूक जाहीर होताच् सगळी माणसे आणून बसवतो, मात्र लँडमाफीयाला आमदारकी मिळणार नाही, असा विश्वास संजू परब यांर्न व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news