Sand Smugglers : आमदार प्रशांत बंब यांचा वाळू तस्करांवर प्रहार

गंगापूर तालुक्यात महसूल, पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर
sambhajinagar news
आमदार प्रशांत बंब यांचा वाळू तस्करांवर प्रहारfile photo
Published on
Updated on

MLA Prashant Bamb lashes out at sand smugglers

गंगापूर / वाळूज, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि तस्करीविरोधात आमदार प्रशांत बंब यांनी सुरू केलेल्या मोहिमेचा परिणाम दिसून आला. त्यांच्या कारवाईनंतर महसूल व पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.

sambhajinagar news
Illegal Sand Mining : खरपुडी शिवारात ३५० ब्रास अवैध वाळू साठा जप्त!

आमदार प्रशांत बंब नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गान प्रवास करत असताना सचिन हॉटेलजवळ संशयास्पदरीत्या उभा असलेला हायवा त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ संबंधित वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिवपूर फाटा येथे उभा असलेला टिप्परही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. दोन्ही वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाळूज पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.

यानंतर आमदार बंब यांनी शिवपूर-शेंदूरवादा परिसरातील अवैध वाळूसाठ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश दिले. मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूसाठा आढळल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

sambhajinagar news
Crime News : भररस्त्यात तलवार उगारून रिक्षाचालकाला मारहाण

आमदार बंब यांच्या पुढाकारानंतर प्रशासनाने अवैध वाळू व्यवसायाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत असून, आगामी काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news