Crime News : भररस्त्यात तलवार उगारून रिक्षाचालकाला मारहाण

सूतगिरणी चौकात थरार : नागरिकांसमोर माजवली दहशत; तिघांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime News : भररस्त्यात तलवार उगारून रिक्षाचालकाला मारहाणfile photo
Published on
Updated on

Crime News: Rickshaw driver beaten up with sword in public

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मी पोलिस आहे, अशी बतावणी करून पहाटे चार वाजता हुज्जत घालणाऱ्या एका गुंडाने, त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्याच्या रागातून रिक्षाचालकावर भरदिवसा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि.१) सकाळी सव्वानऊच्या सुमारास सूतगिरणी चौकात घडली. भररस्त्यात तलवार उगारून दहशत माजवणाऱ्या या गुंडामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. त्यामुळे जवाहरनगर भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Crime News
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

परमेश्वर एकनाथ चव्हाण (३६), ज्ञानेश्वर एकनाथ चव्हाण (४०), विजय दत्तात्रय लहुगडे (२५, सर्व रा. सूतगिरणी परिसर) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली.

फिर्यादी शुभम चतुर्भुज ऊर्फ सतीश जगरवाल (२१, रा. भारतनगर, गल्ली नं. ५) याच्या तक्रारीनुसार, शुभम हा मित्र समीर नसीर शेख याच्यासोबत सोमवारी (दि. १) सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास रिक्षात प्रवासी घेऊन सूतगिरणी चौकात आला होता.

यावेळी तिथे परमेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, विजय लहुगडे हे तिघे स्कूटीवरून (एमएच २० एचपी ०६४९) आले. तू पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात माझ्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी का गेला होता? अशी कुरापत काढून त्यांनी शुभम आणि भररस्त्यात तलवार हवेत फिरवत दहशत माजविणारा आरोपी. समीरला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वर चव्हाण यानेही माझ्या भावाला कशामुळे भांडता, असे म्हणत मारहाण केली.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar crime : सिडको ठाण्याच्या 100 फुटांवर तरुणाची हत्या, तब्बल 7 तासांनंतर पोहोचले पोलिस

हातापाई आणि मारहाणीदरम्यान परमेश्वर चव्हाण याने तलवार काढून हवेत फिरवली आणि तुम्हाला तलवारीने जिवे मारून टाकीन, अशी धमकी देत दहशत माजवली. या थरारामुळे चौकात मोठी तारांबळ उडाली. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेले नसीर शेख, शेख यासिम आणि शेख समीर नयुब यांनी धाव घेत मध्यस्थी केली आणि त्यांची सोडवणूक केली.

त्यानंतर शुभम आणि त्याच्या मित्रांनी प्रसंगावधान राखून परमेश्वरच्या हातातील तलवार हिसकावून घेत थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली पहाटे पोलिस असल्याचे सांगून दमदाटी सूतगिरणी चौकातील या थराराची ठिणगी पहाटेच पडली होती. सोमवारी पहाटे ४ वाजेदरम्यान शुभम आणि समीर हे सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळील एका रसवंतीवर थांबले होते. त्यावेळी परमेश्वर चव्हाण तिथे आला आणि मी पोलिस असून, तुमचे आधार कार्ड, रिक्षाचे लायसन्स आणि बिल्ला दाखवा, असे म्हणत विनाकारण शिवीगाळ करू लागला.

त्यावेळी हा वाद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पोहोचला होता आणि तिथे आपापसांत मिटलाही होता. मात्र त्याच रागातून परमेश्वरने सकाळी साथीदारांसह हा हल्ला केला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news