Sambhajinagar News : शहागंजमध्ये प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला भीषण आग

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी जुने बस स्थानक जवळील शहागंज परिसरात खुल्या जागेवर टाकलेल्या प्लास्टिक पाइपांच्या ढिगाऱ्याला अचानक भीषण आग लागली.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शहागंजमध्ये प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला भीषण आगfile photo
Published on: 
Updated on: 

Massive fire breaks out in a pile of plastic in Shahaganj

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी जुने बस स्थानक जवळील शहागंज परिसरात खुल्या जागेवर टाकलेल्या प्लास्टिक पाइपांच्या ढिगाऱ्याला अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. धराचे लोळ आकाशात पसरल्याने सर्वत्र फटाका मार्केटला आग लागल्याची अफवा पसरली होती.

Sambhajinagar News
Deepotsav 2026 : दीपोत्सवाला जल्लोषात प्रारंभ

दुपारी सुमारे २:४० वाजण्याच्या सुमारास फिरोज खान यांनी अग्निशमनला आगीची माहिती दिली. आग एवढी तीव्र होती की घटनेच्या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते. संपूर्ण शहरातून कुठूनही पाहिले असता हा धूर स्पष्टपणे दिसत होता.

माहिती मिळताच अग्निशमनचे पथक तात्काळ एका फायर टेंडरसह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या मदतीला सिडको, एन-९ अग्निशमन केंद्राची गाडी व पथकदेखील वेळेवर पोहोचले होते. ड्युटी अधिकारी डी. आर. गंगावणे, अग्निशामक जवान मोहम्मद मुझफ्फर, प्रसाद शिंदे, अजिंक्य भगत, संकेत निकाळजे यांनी धाव घेतली.

Sambhajinagar News
Abdul Sattar : दुष्काळात कर्जवसुलीला स्थगिती द्या !

फटाक्यांमुळे आगीच्या घटना

लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना शहरातील विविध भागांत आगीच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या. गारखेडा परिसरातील गजानननगर, जिन्सी, विद्यापीठ परिस-रातील हनुमान टेकडी तसेच सिडको भागात फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती समोर आली. या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन बंबांच्या साहाय्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनांमध्ये मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. फटाके फोडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान विद्यापीठ परिसरातील हनुमान टेकडी येथे फटाक्यामुळे गवताला आग तसेच गजानन नगर भागातील एका घराच्या वरच्या मजल्यावरील छपराला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.