FDA License Suspension : मधुर मिलन मिठाईसह चार आस्थापनांना टाळे

निलंबन काळात व्यवसाय करणे भोवले, लासूर येथील दोन ऑईल रिपॅकिंग युनिटचा समावेश
FDA License Suspension
FDA License Suspensionpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : खाद्य,अन्न पदार्थात भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या २ ऑईल रिपॅकिंग युनिट, २ मिठाई व फराळ उत्पादकांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. मात्र, यानंतरही नियमांची पायमल्ली करत व्यवसाय करणाऱ्या चारी आस्थापनांना एफडीएने थेट टाळे ठोकले आहे. या रेल्वेस्टेशन येथील मधुर मिलन मिठाई, साई भंडार फराळ यांच्यासह लासूर येथील दोन ऑईल रिपॅकिंग युनिटचा समावेश आहे.

राज्यात सेफ फुड सेफ महाराष्ट्र या मोहिमेंतर्गत भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडका सुरू आहे. याअंतर्गतच रेल्वेस्टेशन रोडवरील मेसर्स मधुर मिलन मिठाई उत्पादक, साई भंडार फराळ उत्पादकासह लासूर येथील गुरू गणेश ऑईल रिपॅकिंग युनिट आणि रवी ऑईल ऑईल रिपॅकिंग युनिटचे परवाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून रद्द करण्यात आले होते. तरी सुद्धा निलंबन कालावधी मध्ये व्यवसाय चालू ठेवून नियमांची पायमल्ली करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून धडक कारवाई घेऊन या चारही आस्थापनांना सील ठोकले आहे.

FDA License Suspension
Chhatrapati Sambhajinagar Illegal Mining : गांधेलीत गौण खनिज माफिया बेफाम

निलंबन कालावधीत व्यवसाय करणाऱ्या य चारी आस्थापना यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पुढेही कोणी निलंबन कालावधीत व्यवसाय चालू ठेवल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून अन्न परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले आहे.

FDA License Suspension
Sambhajinagar Water Theft : दुष्काळातही कायगाव तलावातील पाणी चोरीला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.