Sambhajinagar Crime News : अजिंठा घाटात व्यापाऱ्यावर हल्ला

भरदिवसा दोघांची मारहाण, पावणेतीन लाख रुपये लुटले
sambhajinagar crime news
Sambhajinagar Crime News : अजिंठा घाटात व्यापाऱ्यावर हल्लाFile Photo
Published on
Updated on

Merchant Attacked in Ajanta Ghat

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा अजिंठा घाटात भरदिवसा एका व्यापाऱ्याला अडवून मारहाण करत २ लाख ७० हजार रुपये लुटले. ही घटना रविवारी (दि.३) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

sambhajinagar crime news
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून एका जिनिंगमधून २ लाख ७० हजार रुपये घेऊन दुचाकीवरून अजिंठ्याकडे येत असताना घाटातील दर्याजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी व्यापारी शेख युसूफ शेख लुकमान (५०, रा. स्नेहनगर, सिल्लोड) यांना अडवले. त्यानंतर आरोपींनी शेख युसूफ यांना मारहाण करून गंभीर जखमी केले.

हल्लेखोरांनी व्यापाऱ्याकडील २ लाख ७० हजार रुपयांची रक्कम हिसकावून घेतली व त्यांचा मोबाईलही फोडून टाकला. गंभीर जखमी अवस्थेत शेख युसूफ शेख लुकमान यांनी दुचाकीवरून अजिंठा पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्यांना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नातेवाइकांनी त्यांना सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात हलविले.

sambhajinagar crime news
Crime News : वडगाव कोल्हाटीत हद्दपार आरोपीवर चाकूने जीवघेणा हल्ला

या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news