

Meat sale ban August 15 Shri Krishna Janmashtami Muncipal Corporetion
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने यंदा १५ ऑगस्ट रोजी मांस, मासे विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच आदेशही प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन श्रावण महिन्यात मांसाहारावरून वाद पेटला आहे. परंतु, मांस विक्री बंदीचे हे आदेश १५ ऑगस्टसाठी नसून श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी दिले आहेत. दरवर्षी महापालिका जन्माष्टमीला असे आदेश जारी करते, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. १३) सांगितले.
शहरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही या उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असताना महापालिकेच्या आदेशाने वादंग निर्माण केले आहे. या आदे शानुसार १५ ऑगस्ट रोजी मांस व मांसे विक्रीवर बंदी घातली आहे. सध्या श्रावण महिना सुरू असून या महिन्यात हिंदू धर्मामध्ये मांसाहारावर बंदी असते. हेच निमित्त पुढे करीत काहींनी गैरसमज पसरविण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेने १५ ऑगस्टला मांस विक्री केल्याचे कारण पुढे करून वादंग निर्माण केले आहे. महापालिका प्रशासन मनमानी करीत असल्याचा आर-ोपही करण्यात येत आहे. दरम्यान, हा गैरसमज दूर करीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी आदेशाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर महापालिका दरवर्षी श्रीकृष्ण जन्मअष्टमीनिमित्ताने मांस व मासे विक्रीवर बंदी घालते. त्याबाबत प्रशासनाकडून आदेशही जारी करण्यात येत असतो. त्यामुळे हा आदेश पहिल्यांदाच काढलेला नाही. ही मांस विक्री श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने बंद ठेवलेली आहे. १५ ऑगस्टसाठी ही बंदी घालण्यात आलेली नाही.