Mayor visits Korea : पाणीपुरवठ्यातील सुधारणांच्या अभ्यासासाठी महापौर कोरियाच्या दौऱ्यावर

जागतिक बँकेकडून निवड : १४ देशांचे प्रतिनिधी होणार सहभागी, दौऱ्याचा संपूर्ण खर्च जागतिक बँक उचलणार
Mayor visits Korea
Mayor visits Korea : पाणीपुरवठ्यातील सुधारणांच्या अभ्यासासाठी महापौर कोरियाच्या दौऱ्यावरfile photo
Published on: 
Updated on: 

Mayor visits Korea to study water supply improvements

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल परिवर्तनाच्या नव्या संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी महापौर समीर राजूरकर शनिवारी (दि. १४) दक्षिण कोरियासाठी रवाना होणार आहेत. जागतिक बँकेच्या निवडीतून त्यांना या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च जागतिक बँकेकडून केला जाणार आहे.

Mayor visits Korea
Knife Attack : तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला

पाणीपुरवठा योजनांमधील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि या क्षेत्रातील विविध देशांनी केलेल्या सुधारणांची देवाणघेवाण यासाठी कोरियाच्या वॉटर रिसोर्सेस कॉर्पोरेशनतर्फे (के-वॉटर) सेऊल आणि डेजॉन या शहरांमध्ये १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जगभरातील १४ देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जागतिक बँकेने महाराष्ट्रातील तीन प्रतिनिधींची निवड केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि नागपूरचे आयुक्त बिपिन इटनकर यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व या परिषदेत होणार आहे.

Mayor visits Korea
Sambhajinagar News : वर्षभर टँकरचा प्रस्ताव, नव्या पाणी योजनेचा जल्लोष कशासाठी?

या परिषदेच्या निमित्ताने केवळ चर्चासत्रांपुरते कार्यक्रम मर्यादित नसून, सेऊल आणि डेजॉन शहरांतील पाणीपुरवठा व्यवस्थेतील आधुनिक बदल, तांत्रिक सुधारणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी विविध ठिकाणी क्षेत्रभेटींचेही आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून संबंधित शहरांमधील पाणी व्यवस्थापनाचे मॉडेल जवळून अभ्यासण्याची संधी प्रतिनिधींना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.