Knife Attack : तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला

भावाला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे निघालेल्या तरुणाला रस्त्यात गाठून इसको खतम करो म्हणत चाकूने हल्ला चढविला.
Knife Attack
Knife Attack : तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या तरुणावर चाकू हल्लाfile photo
Published on: 
Updated on: 

Knife attack on a young man on his way to file a complaint

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भावाला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे निघालेल्या तरुणाला रस्त्यात गाठून इसको खतम करो म्हणत चाकूने हल्ला चढविला. दुसरा वार करण्याचाही प्रयत्न झाला मात्र, तो हातावर झेलल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री ११.२० वाजता उस्मानपुरा येथील कामगार चौकात घडली. या प्रकरणी संतोष कलाणी, राजसिंग संतोष कलाणी, धनराजसिंग संतोषसिंग कलाणी, सागर खरे आणि प्रेम खरे यांच्याविरूद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Knife Attack
Diwali 2026 : दीपोत्सवाच्या चार दिवसांत दोन हजार कोटींची उलाढाल

आकाश व्यकंट खरात (३४, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) हे बांधकाम ठेकेदार आहेत. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचा लहान भाऊ कुणाल खरात याच्या दुचाकीला राजसिंग कलाणी याने कट मारला. कुणालने त्याला मिलिंदनगर येथे थांबवून गाडी हळू चालविण्यास सांगितले. त्यावरून राजसिंग, धनराजसिंग आणि संतोष कलाणी यांनी कुणालला बेदम मारहाण केली.

जखमी कुणालला घाटी रुग्णालयात नेण्यात आले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आकाश हे भावासह पोलिस ठाण्याकडे परतत होते. रात्री ११.२० वाजेच्या सुमारास संतोष कलाणी, प्रेम खरे आणि सागर खरे यांनी त्यांना रस्त्यात अडवून तक्रार न करण्याची धमकी दिली. तरीही आकाश यांनी तक्रार करणारच असल्याचे स्पष्ट केले.

Knife Attack
Swachh Survekshan : स्वच्छ सर्वेक्षणात शहराच्या निकालाची उत्सुकता

तक्रार करणारच म्हणताच संतोषच्या चिथावणीनंतर प्रेम खरे याने आकाश यांचे दोन्ही हात पकडले, तर सागर खरे याने चाकूने पोटात वार केला. त्यानंतर पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला असता आकाशने तो वार हातावर अडवला. या दरम्यान आरडाओरड झाल्याने नागरिक जमा होऊ लागताच तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश यांना मित्र विशाल थोरात, आनंद बनकर आणि भाऊ करण थोरात यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. या प्रकरणात उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.