इमारतीवरून उडी मारून विवाहितेने जीवन संपवले

शहरातील मांडवा रोड परिसरात शनिवारी सकाळी एका विवाहित महिलेने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले.
Married Woman Ends Her Life
इमारतीवरून उडी मारून विवाहितेने जीवन संपवलेFile Photo
Published on
Updated on

Married Woman Ends Her Life by Jumping from a Building

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील मांडवा रोड परिसरात शनिवारी सकाळी एका विवाहित महिलेने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वैशाली सुनील चिकटकर असे या महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोटच्या मुलांच्या शिक्षणासाठी शहरात आलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने जवळगावसह अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Married Woman Ends Her Life
Jalna News : दामिनी पथकाची शाळेला भेट

तालुक्यातील जवळगाव येथील मूळ रहिवासी असलेले सुनील चिकटकर हे आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात स्थायिक झाले होते. मांडवा रोडवरील शितोळे यांच्या मालकीच्या तीन मजली इमारतीमध्ये हे कुटुंब भाड्याने वास्तव्यास होते.

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसल्याची संधी साधून वैशाली चिकटकर यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. त्या थेट सिमेंटच्या रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Married Woman Ends Her Life
Beed Crime News : घळाटवाडीत मेंढपाळांवर जीवघेणा हल्ला

दरम्यान, वैशाली चिकटकर यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे नागरिक सुन्न झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news