Beed Crime News : घळाटवाडीत मेंढपाळांवर जीवघेणा हल्ला

दोघेजण गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू; पोलिसांनी नोंदवला जवाब
beed crime news
घळाटवाडीत मेंढपाळांवर जीवघेणा हल्लाfile photo
Published on
Updated on

Fatal attack on shepherds in Ghalatwadi

वडवणी, पुढारी वृत्तसेवा माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे पुसरा येथील मेंढपाळांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेत बिटे कुटुंबातील दोन तरुण सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या घटनेमुळे धनगर समाजासह मेंढपाळ बांधवांत संतापाची लाट पसरली असून सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळतात मला ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ता वाकसे जखमींची भेट घेऊन दिलासा दिला आहे.

beed crime news
महिला-बालकल्याणसह सहा समित्यांसाठी आजपासून अर्ज

मंगळवार रोजी वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ लहू बीटे, बाबा बीटे हे मेंढ्या चारण्यासाठी घेऊन माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे गेले होते. बांधावरून जाण्याच्या कारणावरून समाजकंटकांनी लहू बीटे व बाबा बीटे या दोन भावांना काठीने निर्दयीपणे मारहाण केली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच मल्हार ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी बिटे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमींची प्रकृती विचारपूस करत संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली.

beed crime news
कष्टाच्या जीवनात सोशल मीडियाने दिला आनंदाचा क्षण

मेंढपाळ समाजावर झालेल्या या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यानंतर दत्ता वाकसे यांनी बीड जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन आरोपींच्या अटकेसाठी आज प्रा. हाके करणार आंदोलन माजलगाव तालुक्यात मेंढपाळावर झालेल्या हल्ला प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करत तत्काळ अटक करावी या मागणीसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हे आंदोलन करणार आहेत. माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी सकाळी अकरा वाजता ते पोहचणार असून या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक देखील दाखल होणार आहेत.

पांडकर यांची भेट घेऊन या प्रकरणी निवेदन सादर केले. मेंढपाळांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेतील दोषींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटनांवर प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावर अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन दिले.

पोलिस प्रशासन या घटनेचा तपास करत असून दोषींना वाचवले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेनंतर मेंढपाळ समाजामध्ये संतापाची लाट पसरली असून जखमींची भेट घेण्यासाठी समाजातील मेंढपाळ बांधव तसेच महिलाही मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात उपस्थित होत्या. समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news