मराठवाड्यात सरासरी 70 टक्के मतदान

संभाजीनगर, परभणी, लातुरात गोंधळ; धाराशिवमध्ये शांततेत मतदान
Marathwada zp election voting 70 percent
मराठवाड्यात सरासरी 70 टक्के मतदानfile photo
Published on
Updated on

Marathwada recorded an average voter turnout of 70 percent

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या गट आणि गणासाठी मतदान प्रक्रिया शनिवारी (दि.७) पार पडली. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात शांततेत मतदान झाले तर छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि परभणी जिल्ह्यात हाणामाऱ्या, दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्जच्या घटना घडल्या. जवळपास ७ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर मतदान केंद्रांवर लागलेल्या लांबच लांब रांगा पाहता मराठवाड्यात सरासरी ७० टक्क्यांच्या घरात मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Marathwada zp election voting 70 percent
AIMIM Mayor Candidate : एमआयएमकडून महापौरसाठी हिवराळे, उपमहापौरसाठी अहेमद यांना उमेदवारी

सकाळी मतदानाची गती संथ होती, मात्र दुपारनंतर मतदारांनी केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. परभणी जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अंदाजे ७१ टक्के बंपर मतदानाची नोंद झाली आहे. तर धाराशिव जिल्ह्यात ६५.४२ टक्के मतदान झाले आहे. लातूर जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.०५ टक्के मतदान झाले होते.

मात्र, शेवटच्या दोन तासांत मतदारांचा ओघ वाढल्याने आणि प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण ६३ टक्के मतदान झाले. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरा मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. या चारही जिल्ह्यांत मिळून सरासरी ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे. चारही जिल्ह्यांतील हजारो उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे

Marathwada zp election voting 70 percent
Paithan ZP Election | पैठणचे आमदार विलास भुमरेंकडून नियमांचे उल्लंघन; मतदान केंद्रात अल्पवयीन मुलाच्या बोटाला लावली शाई

बोथ गावात मतदानावर १०० टक्के बहिष्कार

एकीकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चढाओढ सुरू असताना, परभणीतील सेलू तालुक्यातील बोथ आणि बोथ तांडा येथील ग्रामस्थांनी मात्र लोकशाहीच्या उत्सवाकडे पाठ फिरवली. गावात रस्ता आणि पूल नसल्याच्या निषेधार्थ येथील ४६६ मतदारांनी मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला. प्रशासनाने समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही आधी रस्ता, मग मतदान या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने येथे एकही मत नोंदवले गेले नाही.

उदगीरमध्ये दगडफेक; पोलिस कर्मचारी जखमी

उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील निडेबन गावातील बूथ क्रमांक १६ वर मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात तणाव निर्माण होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली. यात बंदोबस्तासाठी आलेले वर्ध्याचे पोलिस कर्मचारी मंगेश सोनोणे हे जखमी झाले आहेत. मतदानाची वेळ संपत आल्यावर जवळपास ३० ते ३५ मतदार ररांगेत उभे होते. त्यांना टोकन (चिट्ट्या) वाटप सुरू असतानाच काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस पुढे सरसावले असता, गर्दीतून भिरकावलेला दगड मंगेश सोनोणे यांच्या डोक्याला लागला. दगड लागल्याने सोनोणे यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तत्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. दगड भिरकावणारी व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन फरार झाली,

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी राडा

छत्रपती संभाजीनगर: शहरालगतच्या बजाजन-गरातील अल्फोन्सा स्कूल मतदान केंद्राबाहरे शिव सेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल चोरडिया यांनी समर्थकांसह भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या पोलिंग वाटप बूथवर पैसे वाटप केले जात असल्याच्या आरोप करत चांगलाच गोंधळ घातला, यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी पोलिग वाटप बूथवरील टेबल, खुर्थ्यांची तोडफोड केली. तसेच भाजप पुरस्कृत उमेदवार अश्विनी गवळी यांच्यासह महिलांना धमकी दिली असल्याचा आरोप गवळी यांच्या समर्थकांनी केला आहे.

ईव्हीएमची हळदी कुंकू लावून पूजा बजाजनगर येथील अल्फोन्सा मतदान केंद्रावर शिव सेना शिंदे गटाच्या उमेदवार रत्नमाला ढमढेरे यांनी ईव्हीएम मशीनची हळदी-कुंकू लावून पूजा केली. तसेच नारळही वाहिला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये आमचे भवितव्य अवलंबून आहे.

शिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ बाहून करतात असे सांगत केलेल्या कृतीचे ढमढेरे यांनी समर्थन केले. चार बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख विद्यालय व राजा शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर बोगस मतदान करताना काही जणांनी बोगस मतदारांना रंगेहाथ पकडून त्यांची चांगलीच धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. देशमुख विद्यालयाच्या मतदान केंद्रावर दोघांना तर राजा शिवानी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर दोघांना अशा चार बोगस मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंभईत पोलिसांचा लाठीयार्ज सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे भाजप-शिवसे नेचे कार्यकर्ते किरकोळ वादातून आपसात भिडले. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात हाणामारी सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news