Sambhajinagar MIDC Fire : टूलरूमच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात शेरखान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील भाग्यश्री ट्रेडर्स या दुकानाला रविवारी (दि. ८) सायंकाळी आग लागून लाखो रुपये किमतीचे विविध प्रकारचे टूल, इलेक्ट्रिक सामान तसेच हार्डवेअर जळून खाक झाले.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार गणेश सोनवणे यांचे वाळूज एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक के-२३२ मध्ये भाग्यश्री ट्रेडर्स या नावाने इंडस्ट्रियल साहित्य विक्रीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक या दुकानाला आग लागली.

Crime News
Nanded Crime : नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्‍हे शाखेची कारवाई

दुकानात काम करणाऱ्या मुलांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली. मात्र तो पर्यंत दुकानातील कटिंग टूल. फेब्रिकेशन साहित्य. हार्डवेअर, केबल वायर आदी इंडस्ट्रियल मटेरियल जळून खाक झाले.

कामगाराने कंपनीचे कूलिंग टॉवर जाळले

कामावरून काढल्याचा राग आल्याने एकाने कंपनीचे एआरपी कूलिंग टॉवर जाळल्याची घटना शनिवारी (दि.७) रात्री वडगाव शिवारातील इरोटेक इंजिनिअरिंग कंपनीत घडली. या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर पुरी यांची वडगाव कोल्हाटी शिवारातील गट क्रमांक ६१ मध्ये ड्रोटेक इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे.

Crime News
Chikhali Suspicious Death: चिखलीत २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ दगड आढळल्याने खुनाचा संशय

या कंपनीत काम करणाऱ्या शेरखान पठाण (५० रा. आझाद चौक, छत्रपती संभाजीनगर) यास पुरी यांनी कामावरून काढून टाकले होते. याचा राग आल्याने शेरखान याने शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कंपनीतील एआरपी कूलिंग टॉवर जाळून कंपनीचे ९० हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी सागर पुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात शेरखान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.