Sambhajinagar News : दबंग नगरसेवक आयुक्तांच्या रडारवर

दादागिरी, शिवीगाळ केल्यास होणार फौजदारी गुन्हे दाखल
sambhajinagar muncipal corporetion news
दबंग नगरसेवक आयुक्तांच्या रडारवरFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासूनच नवनिर्वाचित नगरसेवक अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. यातील काही जण अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून दादागिरी करीत असल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. त्यामुळे हे दबंग नगरसेवक आता आयुक्त जी. श्रीकांत यांच्या रडारवर आले असून, त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

sambhajinagar muncipal corporetion news
Railways housefull : लग्नसराईमुळे विविध मार्गावरील रेल्वे फुल्ल ; अनेक प्रवासी वेटिंगवर

महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारी (दि. १६) विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागाकडील कामांची माहिती घेत वसुलीबाबत विचारणा केली. तसेच विकासकामांवरही चर्चा झाली. या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी नगरसेवकांकडून मिळत असलेल्या असभ्य वागणुकीबाबत आयुक्तांना माहिती दिली.

नगरसेवक शिवीगाळ आणि दादागिरी करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यावर आयुक्त म्हणाले, जे नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतील, दादागिरी करतील, दाराला लाथ मारतील, टेबलवर हात आपटतील अशांच्या विरोधात सरकारी कामात अढथळा केल्याच्या कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. कोणत्याही नगरसेवकाची किंवा त्यांच्या नातेवाइकांची दादागिरी सहन करू नका, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नगरसेवक अधिकाऱ्यांच्या दालनात आलेच तर त्यांचे स्वागत करा, त्यांचे म्हणणे ऐका, ते नोंदवून घ्या, अशी सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली.

sambhajinagar muncipal corporetion news
Sambhajinagar News : अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध : अधिष्ठाता

पदाधिकाऱ्यांना मंजुरीप्रमाणेच कर्मचारी

महापौर, उपमहापौरांच्या कार्यालयात आकृतिबंधानुसार कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आकृतिबंधाव्यतिरिक्त कर्मचारी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news