Mahavitaran News : लवकरच महावितरणला मिळणार ५० ई वाहने

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केल्यानंतर महावितरणने प्रतिसाद देत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे.
Mahavitaran News
Mahavitaran News : लवकरच महावितरणला मिळणार ५० ई वाहनेfile photo
Published on
Updated on

Mahavitaran to receive 50 electric vehicles soon

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केल्यानंतर महावितरणने प्रतिसाद देत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांसाठी सुमारे ५० ई वाहने उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mahavitaran News
Parbhani News : स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांची कोंडी

इंधन बचतीसाठी महावितरणने ई वाहने वापरण्याचे पाऊल उचलले आहे. याची सुरुवात महावितरणच्या अध्यक्षांपासून झाली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य अभियंता ते उपविभागीय अभियंत्यापर्यंत ही वाहने देण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मुख्य अभियंता ते उपविभागीय अभियंता पदावरील जवळपास ५० अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनाही लवकच विद्युत वाहने मिळण्याची शक्यता आहे. यातील काही ई-वाहने महावितरण खरेदी करेल तर काही ई-वाहने भाडेतत्त्वावर घेतली जाऊ शकतात, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

Mahavitaran News
Bibi Ka Maqbara : बीबी का मकबऱ्याच्या ऐतिहासिक भिंतींचे संवर्धन सुरु

राज्य शासनाच्या विद्युत वाहन धोरण २०२५ ला अनुसरून महावितरणने पेट्रोल व डिझेल वाहनांऐवजी विद्युत वाहनांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विद्युत वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, प्रादेशिक विभागांचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सर्व कार्यकारी संचालकांनी नुकताच वापर सुरू केला आहे. ही वाहने गुरुवारी (दि.१४) उपलब्ध झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news