Bibi Ka Maqbara : बीबी का मकबऱ्याच्या ऐतिहासिक भिंतींचे संवर्धन सुरु

ढासळणाऱ्या संरचनेला नवसंजीवनी देण्याचा उपक्रम
Bibi Ka Maqbara
बीबी का मकबऱ्याच्या ऐतिहासिक भिंतींचे संवर्धन सुरुfile photo
Published on
Updated on

Conservation of the historic walls of Bibi Ka Maqbara has begun.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक स्तरावर दख्खनचा ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक बीबी का मकबरा परिसरातील आतील संरक्षक भिंतींच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून जीर्णावस्थेत गेलेल्या आणि काही ठिकाणी ढासळण्याच्या स्थितीत आलेल्या या भिंतींच्या दुरुस्तीमुळे या वारसास्थळाच्या संरक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.

Bibi Ka Maqbara
Devagiri Fort : देवगिरी किल्ला पुन्हा आगीच्या विळख्यात, दुर्मिळ वनस्पती, वन्यजीवांचे मोठे नुकसान

पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या वास्तूभोवतीच्या भिंती काळाच्या ओघात कमकुवत झाल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही भागात तडे, दगडी रचना सैल होणे आणि पडझडीची चिन्हे दिसत असल्याने संवर्धनाची गरज होती. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी व लाकडी आधार देण्यात आले होते.

ऐतिहासिकता टिकवण्यावर भर आता प्रत्यक्ष संवर्धन आणि मजबुतीकरणाच्या कामाला प्रारंभ झाल्याने ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या प्रक्रियेत मूळ वास्तुशैली अबाधित ठेवत पारंपरिक दगडी बांधकाम पद्धतीचा वापर केला जात आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली संवर्धनाचे काम सुरू असून, भिंतींची मजबुती, सौंदर्य आणि ऐतिहासिकता टिकवून ठेवण्यावर भर दिला जात आहे. दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक या वास्तूला भेट देतात. त्यामुळे परिसराची सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Bibi Ka Maqbara
Sahyadri News: गनिमी काव्यापासून ग्लोबल इंजिनिअरिंगपर्यंतः सह्याद्रीने पुन्हा जिंकली लढाई

वारसा जपण्याचा प्रयत्न

बीबी का मकबरा ही केवळ पर्यटनस्थळ नसून छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे या वास्तूचे जतन आणि संवर्धन हे शहराच्या वैभवाचे संरक्षण मानले जात आहे. प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाच्या या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारशाला नवी उभारी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news