LPG shortage : एलपीजीचा तिढा सुटेना : रिक्षा चालक हवालदिल

तीन पंपांवर सकाळी गॅस दाखल, रिक्षांची पुन्हा गर्दी वाढली
LPG shortage
LPG shortage : एलपीजीचा तिढा सुटेना : रिक्षा चालक हवालदिलfile photo
Published on
Updated on

LPG shortage continues: Rickshaw driver in distress

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जागतिक घडामोडींचा फटका एलपीजीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेला गॅस पुरवठा अद्यापही सुरळीत न झाल्याने रिक्षा चालक हवालदिल झाले आहेत. दरम्यान गुरुवारी (दि.२) सकाळी हर्सल टी पॉइंट, चिकलठाणा आणि हर्सल येथील पंपावर गॅस पुरवठा झाल्याने पुन्हा रिक्षांच्या रांगा वाढल्या आहेत.

LPG shortage
LPG gas price hike : एलपीजी गॅसच्या दरात एकाच दिवसात १३ रुपयांची वाढ

युद्ध सुरू होताच पंपावर एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत होता. तो वाढत जाऊन जिल्ह्यातील सुमारे १८ पंप कधी कोरडे, तर कधी मोजक्याच पंपावर गॅस उपलब्ध, अशी अवस्था झाल्याने एलपीजी रिक्षा चालकांची धावाधाव सुरू आहे. ही धावाधाव अद्यापही थांबली नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दोन दिवसांनंतर शहरातील हसूल, चिकलठाणा आणि हर्मूल टी पॉइंटवरील पंपावर गॅस पुरवठा झाल्याने पुन्हा रिक्षाचालकांनी त्या पंपाकडे धाव घेतली. तर काही रिक्षाचालकांनी गॅसची झंझट नको म्हणत पेट्रालवरच रिक्षा चालवण्यासाठी कसरत करत आहेत. असे असले तरी गॅस भरण्यासाठी पुन्हा रिक्षांच्या रांगा वाढल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत.

LPG shortage
LPG Shortage : एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक रिक्षांची चाके थांबली

प्रवाशांसोबत शाब्दिक चकमक

दरम्यान इंधन दरवाढ झाल्याने रिक्षाचालकांनी अघोषित दरवाढ केली आहे. त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांत अनेकदा शाब्दिक चकमकी वाढत आहेत. दरम्यान, प्रवाशांना पूर्ण कल्पना देऊनच १० रुपये अधिकचे भाडे सांगून बसण्यास सांगत आहेत. तर काही रिक्षाचालकांना उतरतेवेळी जास्त पैसे मागण्यात येत असल्याने वाद वाढत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news