Sambhajinagar Crime : रिक्षा चालकांकडून लूटमार, हल्ले, गैरवर्तनाचे प्रकार वाढले

प्रवासी तरुणी, महिला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : रिक्षा चालकांकडून लूटमार, हल्ले, गैरवर्तनाचे प्रकार वाढले File Photo
Published on
Updated on

Looting, assaults, and abuse by rickshaw drivers have increased

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही महिन्यांपासून काही रिक्षा चालकांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मंगळवारी सिटी चौक हद्दीत आवेज खान या प्रवासी तरुणाला रिक्षाचालक शेख फारुख ऊर्फ पत्रा याने तीन साथीदारांच्या मदतीने रिक्षा भाड्याच्या १० रुपयांवरून रॉडने जबर मारहाण करत पाय फॅक्चर केला. यापूर्वी १० ते १५ गंभीर घटनांमध्ये रिक्षाचालक असल्याचे उघड झाल्याने नागरिक, महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : जिथे मस्ती, तिथेच उतरवला माज : गुंड टिप्या, टवाळखोर समीर अन् ड्रग्स तस्कर नियाजची धिंड

काही रिक्षाचालक नशापाणी तर काही पोलिसांच्या रेकॉडवरील आरोपी रिक्षा चालवत असल्याचेही यापूर्वी उघड झालेले आहे. मोठ्या आवाजात गाणी लावून सुसाट, बेशिस्तपणे रिक्षा पळवणे, रस्त्यात कुठेही अचानक थांबणे, दमदाटी करणे, अरेरावी करणे असे प्रकार सर्रास घडतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून लूटमार, हल्ले, चोरी, थेट खुनापर्यंत काहींची मजल गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा रिक्षा चालकांची तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. रिक्षामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी क्यूआर कोड बसविण्यात आलेले नाही. गणवेशात दिसणारे रिक्षाचालक बोटावर मोजण्याएवढेच निघतील. नियमांचे पालन होताना दिसत नाही.

गेल्या काही महिन्यांतील घटना

४ जून: रिक्षा चालक मुजम्मील कुरेशी रफिक कुरेशी (२१, रा. सादातनगर) याने तरुणाला रिक्षात निर्जनस्थळी नेऊन त्याचा खून केला. त्याच्यासह रिक्षा मालकालाही छावणी पोलिसांनी अटक केली होती. २४ जून : रिक्षा चालकाने २० हजार रुपये असलेली बॅग लांबवली सिडको बसस्थानकासमोर वृद्धाचा मोबाईल, स्पीकरसह २० हजारांची रोकड असलेली बंग रिक्षा चालकाने लंपास केली.

Sambhajinagar Crime
Special Train : दिवाळी, छट पूजेनिमित्त विशेष गाडीच्या ६ फेऱ्या

१३ जुलै : प्लॉट दाखविण्याचा बहाण्याने महिलेला निर्जनस्थळी नेऊन घरकुलासाठी ठेवलेले ५० हजार रुपये रिक्षा चालकाने लुटून नेले.

११ ऑगस्ट रिक्षाचालक युसूफ मोहम्मद अली अन्सारी (२७, रा. मोमीनपुरा मशीदजवळ दौलताबाद) याने कामगार आयुक्त कार्यालयातील महिलेला भाडे देण्यावरून रेल्वेस्टेशन सिग्नलवर शिवीगाळ केली. पोलिसांनाही धमकावले.

१८ ऑगस्ट : वृद्धाचा मोबाईल लंपास करणारा रिक्षा चालक शफिक खान रफिक खान (४०, रा. पाण-चक्की जवळ) अयाला गुन्हे शाखेने अटक केली.

१८ ऑगस्ट : तरुणाला चाकूचा धाक दाखवून रिक्षा चालकाने मोबाईल हिसकावून नेला. ३ सप्टेंबर : मोंढा नाक्यावर मुजोर रिक्षा चालकाने भाडे देण्यावरून महिलेच्या पायावरून रिक्षा घातली. तिला खाली ढकलून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news