

6 rounds of special train on the occasion of Diwali, Chhat Puja
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : दिवाळी आणि छट पूजेनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-करीमनगर विशेष गाडीच्या ६ फेऱ्या मंजूर केल्या आहेत.
रेल्वेच्या या निर्णयामुळे दिवाळी व छट पूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी व छट पूजेच्या गर्दीमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस-करीमनगर विशेष गाडी २३ सप्टेंबर ते ७ऑक्टोबर २०२५ दरम्यान दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेस्थानकावरून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हु. सा. नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, अर्मूर, मेटापल्लीमार्गे करीमनगर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
तसेच करीमनगर लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर-२०२५ दरम्यान दर बुधवारी करीमनगर रेल-वेस्थानकावरून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गाने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून २२ डब्बे असतील. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.