बनावट कागदपत्रांद्वारे कोहिनूर शिक्षण संस्थेच्या मालमत्तेवर ५ कोटींचे कर्ज

अध्यक्ष मजहर खान दाम्पत्यावर गुन्हा; धर्मादाय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीसह शिक्क्यांचा वापर
sambhajinagar fraud case news
बनावट कागदपत्रांद्वारे कोहिनूर शिक्षण संस्थेच्या मालमत्तेवर ५ कोटींचे कर्जfile photo
Published on
Updated on

Loan of ₹5 Crore Secured Against Kohinoor Educational Institute's Property Using Forged Documents

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील नामांकित कोहिनूर शिक्षण संस्थेच्या मालमत्तेवर धर्मादाय आयुक्तांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे ४ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपयांचे कर्ज काढून संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

sambhajinagar fraud case news
Sambhajinagar Fraud Case : निवृत्त पीएसआयलाच लावला १ कोटी ३३ लाखांचा चुना

हा प्रकार २०२२ मध्ये घडला. संस्थेचा अध्यक्ष मजहर खान, सचिव आस्मा मनहर खान व इतर अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी (दि. २५) सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार झेवा इद्रिस खान (३५. रा. जुबली पार्क) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील इंदिस खान यांनी १९९२ मध्ये कोहिनूर शिक्षण संस्थेची स्थापना केली होती.

या संस्थेतर्गत कोहिनूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आणि कोहिनूर इन्टिट्यूट ऑफ फार्मसी ही महाविद्यालये चालवली जातात. संस्थेचे अध्यक्ष मजहर अन्वर खान आणि सचिव अस्मा मजहर खान यांनी संगनमत करून धर्मादाय आयुक्त कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर कोट्यवधींचे कर्ज उचलले. यामध्ये खुलताबाद तालुक्यातील मौजे बाइलाबाई आणि नांद्राबाद येथील जमिनींचा समावेश आहे.

sambhajinagar fraud case news
Job Scam : नोकरीचे आमिष दाखवून महिलांना 22 लाखांचा गंडा

तक्रारदाराने ऑनलाइन सातबारा उतारा आणि फेरफार तपासले असता हा प्रकार समोर आला. आरोपींनी प्रोफेक्टस कॅपिटल प्रा. लि. कंपनीकडून २ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे बनावट पूर्वपरवानगी पत्र तयार केले. या पत्रावर धर्मादाय आयुक्ता कार्यालयाचा बनावट शिका आणि अधिकाऱ्यााची बनावट स्वाक्षरी करून ते खरे असल्याचे भासवले.

कर्जाची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली

चोला मंडलम इन्व्हेस्टमेंटकडून २ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपये आणि प्रोफेक्टस कॅपिटल प्रा. लि. कडून २ कोटी रुपये असे एकूण ४ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपये कर्ज उचलले. ही रक्कम शिक्षण संस्थेच्या कामासाठी वापरण्याऐवजी आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वैयक्तिक खात्यावर कळवून घेतली. या प्रकरणी लेबा खान यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. प्राथमिक चौकशीनंतर सिटी चौक ठाण्यात मजहर खान, अस्मा खान आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news