Job Scam : नोकरीचे आमिष दाखवून महिलांना 22 लाखांचा गंडा

ग्रो स्मार्ट रिटेल इंडियाच्या संचालकासह तिघांवर गुन्हा दाखल
Job Scam
नोकरीचे आमिष दाखवून महिलांना 22 लाखांचा गंडाfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महिला बचतगटाच्या माध्यमातून नोकरी आणि मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचे आमिष दाखवून महिलांच्या नावावर परस्पर कर्ज काढून 22 लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 2023 ते 2024 या काळात नवजीवन कॉलनी, एन-11 हडको भागात घडला. अन्विता योगेश काची, हेमंत राजेश रसाळ (दोघे रा. पुणे) आणि हर्षा विजय अंभोरे (रा. नवजीवन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी रोहिणी गजमल (32, रा. मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, सन 2022 मध्ये आरोपींनी फिर्यादी रोहिणी यांच्या घरी जाऊन परिचय महिला बचत महासंघ व गृहउद्योग संलग्न ग्रो स्मार्ट रिटेल इंडिया प्रा. लि. नावाची संस्था असल्याचे सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून बचतगट सुरू करण्यासाठी आणि सदस्य होण्यासाठी प्रत्येकी 1500 रुपये नोंदणी फी घेतली.

Job Scam
Chatrapati Sambhajinagar Crime | गर्भवती विवाहिता जीवन संपवले प्रकरण : फरार पतीला अखेर अटक

तसेच, एन-11 येथील नवजीवन कॉलनीतील कार्यालयात काम देण्याचे आणि दोन-तीन महिन्यांत मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून रोहिणी यांनी स्वतःचे, त्यांच्या आईचे आणि एका ओळखीच्या महिलेचे असे एकूण 4500 रुपये भरले आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक यासारखी कागदपत्रे जमा केली.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मध्ये रोहिणी यांनी संस्थेच्या कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या महिलांची कागदपत्रे जमा करण्याचे कामही केले. अंभोरे ही सभासद महिलांचे पैसे स्वतःकडे घेत होती. दरम्यान, दिवाळीच्या सुट्यांचे कारण सांगून बंद केलेले कार्यालय पुन्हा उघडलेच नाही. रोहिणी यांना कोणताही पगार देण्यात आला नाही.

महिलांच्या नावे परस्पर लाखाचे कर्ज

काही दिवसांनी तुमच्या गाड्या आल्या आहेत, असे सांगून आरोपींनी रोहिणी यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. 28 फेबुवारी 2024 रोजी त्यांना एक इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आली. मात्र ही गाडी जुनी आणि नादुरुस्त होती, जी केवळ दोन-तीन दिवस चालून बंद पडली. पुढे रूपे बाय कार देखो, गिरनार फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते थकल्याचे फोन येऊ लागल्यावर रोहिणी यांना धक्का बसला. चौकशी केली असता, त्यांच्या नावावर अन्विताने तब्बल 1 लाख 51 हजार 980 रुपयांचे कर्ज घेऊन सेकंड हँड गाडी माथी मारल्याचे समोर आले. आरोपींनी कागदपत्रांचा गैरवापर करून आणि ओटीपी घेऊन परस्पर हे कर्ज काढले होते.

अन्विताने पुण्यात केला भव्य सोहळा

तक्रारदाराच्या माहितीनुसार, अन्विता काची ही मास्टरमाइंड आहे. तिने महिलांना कपडे, धान्य, पॅकिंगच्या वस्तू आदींच्या कामाचे आमिष दाखविले. सर्व महिलांना पुण्यात भव्य कार्यक्रमासाठी बस करून घेऊन गेली होती. तिथे सोहळा पाहून महिलांना विश्वास बसला. काही दिवसांतच अन्विताने महिलांच्या नावे परस्पर कर्ज उचलून पोबारा केला.

Job Scam
Chatrapati Sambhajinagar News : चक्क खासगी व्यक्तींने घेतला दुय्यम निबंधकांच्या खुर्चीचा ताबा

13 पेक्षा अधिक महिलांची फसवणूक

आरोपींनी याच पद्धतीने 13 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली आहे. या सर्वांच्या नावावर अंदाजे 22 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.24) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक हरिदास मैदाड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news