Sambhajinagar News : खुनातील जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती; इम्रान मेहंदीला जामीन

इम्रान मेहंदी (५५, रा. आसेफिया कॉलनी) याला विशेष मकोका न्यायालयाने १ ऑगस्ट २०१८ रोजी खुनाच्या गुन्ह्यात सक्त जन्मठेप सुनावली होती.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : खुनातील जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती; इम्रान मेहंदीला जामीनfile photo
Published on: 
Updated on: 

Life sentence in murder case stayed; bail granted to Imran Mehdi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात गुन्हेगार इम्रान मेहंदी ऊर्फ दिलावर शेख नासीर याची जन्मठेपेची शिक्षा औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांनी अपील प्रलंबित असेपर्यंत स्थगित करीत अपिलाचा निकाल लागेपर्यंत त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.

Sambhajinagar News
Bribe Case : दहा हजारांची लाच प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी चतुर्भुज

इम्रान मेहंदी (५५, रा. आसेफिया कॉलनी) याला विशेष मकोका न्यायालयाने १ ऑगस्ट २०१८ रोजी खुनाच्या गुन्ह्यात सक्त जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेविरोधातील अपील प्रलंबित असताना शिक्षा स्थगित करून जामीन मिळावा, यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

बेगमपुरा ठाण्यातील गुन्ह्यानुसार, ९ सप्टेंबर २०११ रोजी शेख नासेर शेख चांद यांना गुंगीचे औषध मिसळलेला ज्यूस पाजून, गळा आवळून आणि चाकूने वार करून ठार करण्यात आले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सावंगी येथील इरफान फार्म हाऊसच्या गट क्रमांक ३२ मधील जमिनीत मृतदेह पुरण्यात आला. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी, १२ मार्च २०१२ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

इम्रानतर्फे अॅड. रूपेश जयस्वाल यांनी युक्तिवाद करताना, या प्रकरणात थेट पुरावा किंवा मृत व्यक्तीला शेवटचे पाहिल्याचा पुरावा नसल्याचे सांगितले. सहआरोपी सय्यद जाहीर याच्या जबाबावरून इम्रानचा सहभाग निष्पन्न करण्यात आला. इम्रानच्या सांगण्यावरून चाकू जप्त केल्याचा पुरावा वगळता त्याच्याविरुद्ध अन्य ठोस पुरावा नसल्याचे सांगितले.

Sambhajinagar News
Samruddhi Expressway : समृद्धीवरील वाहनावर दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तांकडून पाहणी

याच पुराव्याच्या आधारे अन्य पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. ए. एस. शिंदे यांनी अर्जाला विरोध केला. इम्रान हा परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.

खुनाच्या गुन्ह्यात दोषसिद्धीनंतर शिक्षा स्थगित करणे हा अपवाद असल्याचा युक्तिवाद करीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला. खंडपीठाने मूळ कागदपत्रे आणि निकालपत्र तपासल्यानंतर अपिलावर नजीकच्या काळात सुनावणी होण्याची शक्यता नसल्याने त्याची शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला तसेच आदेशात काही निरीक्षणेही नोंदविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.