

License of Pizza Hut, Shelke Mama's Dhaba in Bajajnagar cancelled
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांसाठी एकाच ओव्हनचा वापर, निकृष्ट दर्जाचे तेल आणि प्रचंड अस्वच्छतेत खाद्यान्न अशा गंभीर त्रुटीसह ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष करणे बजाजनगर येथील प्रसिद्ध पिझ्झा हट आणि खुलताबाद-शरनापूर येथील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटला चांगलेच महागात पडले आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे उल्लंघन तसेच तपासणीनंतरही त्रुटी कायम ठेवल्याने अन्न व औषध प्रशासनाने या दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने प निलंबित केले आहेत.
सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत झालेल्या या कारवाईने खाद्य आस्थापनांच्या स्वच्छता व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन्ही आस्थापनांची तपासणी करून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, फेरतपासणीतही नियमभंगाच्या अनेक बाबी कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने सहायक आयुक्त द. वि. पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले.
पिझ्झा हटमध्ये नियमांना हरताळ
बजाजनगर येथील मे. सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेड अर्थात पिझ्झा हटमध्ये खाद्यपदार्थांच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या नोंदी आढळल्या नाहीत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष, कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी तेलाची नियमित गुणवत्ता तपासणी नसणे आणि फूडग्रेड पॅकेजिंगचे प्रमाणपत्र उपलब्ध नसणे, अशा त्रुटी आढळल्या.
साठवणूक क्षेत्रातील कचऱ्याचीही वेळेवर विल्हेवाट लावली जात नव्हती. विशेष म्हणजे व्हेज आणि वापर होत असल्याचे तपासणीत समोर आले. त्याहून गंभीर बाब म्हणजे सर्व पदार्थ व्हेजिटेबल सोयाबीन तेलात तयार केले जातात, असा फलक असताना प्रत्यक्षात मिक्स व्हेजिटेबल फॅट आणि राईस ब्रान तेलाचा वापर करण्यात येत होता.