Sambhajinagar News : वृक्षतोडीला परवानगी देणाऱ्या नोटिशीला हरित लवादात आव्हान

लवादाने महाराष्ट्र शासन आणि इतर प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत.
Tree Cutting
Sambhajinagar News : वृक्षतोडीला परवानगी देणाऱ्या नोटिशीला हरित लवादात आव्हानPudhari
Published on
Updated on

Notice granting permission for tree felling challenged in the Green Tribunal

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्ते आणि विकासकामांसाठी झाडे तोडण्याबाबत महानगरपालिकेने दिलेल्या सार्वजनिक नोटिशीला राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्चिम विभागीय खंडपीठात आव्हान देण्यात आले असून हे अपील दाखल करून घेत लवादाने महाराष्ट्र शासन आणि इतर प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत.

Tree Cutting
bribery trap : गुन्ह्याचे 'तपासनीस' की गुंडांचे 'मदतनीस' ? मुकुंदवाडी ठाण्यात तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ट्रॅप

रूपेश कलंत्री यांनी २७जानेवारी २०२६ च्या सार्वजनिक नोटिशीला आव्हान देत एनजीटीत अपील दाखल केले आहे. लवादाच्या खंडपीठाचे न्या. ज्ञानेश कुमार सिंग आणि सुजितकुमार वाजपेयी यांच्या समोर या अपिलाची सुनावणी झाली. या नोटिशीमुळे झाडे तोडली जाण्याची शक्यता असून, झाडे तोडण्यात आल्यास अपील दाखल करण्याचा उद्देशच निष्फळ ठरेल, असा युक्तिवाद अॅड. निरंजन देशपांडे यांनी सुनावणीदरम्यान केला.

झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केलेल्या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्चिम विभागीय खंडपीठाने महाराष्ट्र शासनासह संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.

Tree Cutting
Sambhajinagar News : दिव्यांग आंदोलकांची महापालिका गेटवर धडक

लवादाने पर्यावरणाशी संबंधित ठोस प्रश्न उपस्थित होत असल्याचे स्पष्ट करत अपील दाखल करून घेतले. महाराष्ट्र शासनासह प्रतिवादींना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपीलकर्त्याला संबंधित कागदपत्रे प्रतिवादींना देण्यासही सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news