

Leopard terror in Nangre Babhulgaon Shivara
लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा :
लासूरस्टेशन व नांगरे बाभुळगाव शिवारात असलेल्या समृध्दी महामार्गाच्या लगत असलेल्या शेतात शेतकऱ्याला अवघ्या १५ मिनिटांत दोन बिबट्याचे दर्शन झाल्याने शेती शिवारातील शेतकऱ्यात भीती वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान लासूर स्टेशन ता गंगापूर परीसरातील अंनतपुर गट नं १३१ व नांगरे बाभुळगाव शिवावर असलेल्या समृध्दी महामार्गालगत असलेल्या मालकीच्या शेतात भगवान ज्ञानदेव बनकर यांना गव्हु पेरायचा होता म्हणून कपाशीत दि.११ गुरुवारी रात्री ९ वाजता रोट्या मारत असताना त्यांना शेतात दोन बिबटे दिसले.
त्यांनी तात्काळ ट्रॅक्टर घेऊन आठशे फुटावर असलेल्या वस्तीवर जाऊन भावाला सोबत घेऊन आल्यावर त्यांना ट्रॅक्टरच्या लाईटच्या उजाडात विहीरीच्या मलम्यावर दोन बिबटे दिसले बनकर यांना १५ मिनीटात दोन वेळेस दोन बिबटे दिसले बनकर यांनी मोबाईल मधुन व्हीडीओ काढला व काम आर्धवट सोडुन वस्ती गाठली ही वाचता परिसरात वाऱ्या सारखी पसरल्याने शेतवत्यावर भीती वातावरण पसरले आहे.
तात्काळ वन विभागाने यांची गभीर दखल घेऊन या परिसरात पिंजरा लावुन बिबट्याचा बदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.