

Bulldozers demolished encroachments in South Jayakwadi.
पैठण, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून पैठण येथील पाटबंधारे विभागाने शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुरूच ठेवली असून, रविवारी या मोहिमेअंतर्गत दक्षिण जायकवाडी येथील अतिक्रमण झालेल्या शासकीय निवासस्थानावर बुलडोजर फिरविण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पैठण पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या शासकीय निवासस्थान व भूखंडावरील झालेले अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अनेक वेळा नोटीस बजविण्यात आली होती. मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत अनेक ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या जागेवरील मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण निष्कासित करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे बैठकीत ठरल्याच्या चर्चेमुळे पैठण पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन या विभागाच्या स्थानिक कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांच्या पथकाने पोलिस बाळाचा वापर व कायदेशीर बाब पूर्ण करून दि. १२ डिसेंबरपासून उत्तर जायकवाडी व नाथसागर धरण परिसरातील जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. रविवारी तिसऱ्या दिवशी पैठण ते शेवगाव रोडवरील असलेल्या दक्षिण जायकवाडी परिसरातील अतिक्रमणावर बुलडोजर फिरविले.
पं. स. चे अधिकारी येणार चौकशीच्या फेऱ्यात
पैठण येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर करण्यात आलेले संजयनगर येथील अतिक्रमणधारकांना कातपूर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक यांनी शासकीय जागेवर घरकुल योजना राबविण्यासाठी अनेक नागरिकांना आठचा उतारा देण्यात आल्यामुळे पैठण पंचायत समिती घरकुल विभागा अंतर्गत अनुदान देऊन शेकडो नागरिकांना घरकुल योजना राबवून पक्क्या घराचे बांधकाम केलेले आहे. यामुळे शासकीय जागेवर घरकुल बांधण्यासाठी नमुना आठ कासा काय देण्यात आला. याची चर्चा आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.