

Leopard terror in Dhawalapuri Shivara
करमाड, पुढारी वृत्तसेवा :
परिसरातील ढवळापुरी शिवारात बिबट्याने गेल्या पंधरा दिवसांपासून मोठी दहशत निर्माण केली आहे. या काळात बिबट्याने जवळपास ८ ठिकाणी हल्ले करून शेतकऱ्यांची ६ जनावरे फस्त केली आहेत. बिबट्याच्या या वाढत्या आणि हिंस्त्र वावरामुळे स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपूवी रात्री बिबट्याने ढवळापुरी येथील शेतकरी पांडुरंग हिंमत पुंगळे यांच्या गट नंबर १५ मधील गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात एका बकरीचा फडशा पडला, एक बकरी जखमी झाली, तर बिबट्या दोन बकऱ्यांना घेऊन पसार झाला. तर गुरुवारी सकाळी शेतात गेल्यावर ही घटना लक्षात आल्यानंतर पुंगळे यांनी गावकऱ्यांना आणि वन विभागाला तातडीने माहिती दिली. ढवळापुरी, वाहेगाव आणि गोलटगाव या शिवारांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे.
गोलटगाव परिसरात बिबट्या नसून तरस असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले नसले, तरी बिबट्याची मुख्य उपस्थिती या भागात कायम आहे. शेतकरी शरद पुंगळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, गेल्या पंधरा दिवसांत ७ ते ८ ठिकाणी झालेल्या हल्ल्यांची माहिती वन विभाग आणि करमाड पोलिसांना देऊनही बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
संभाजीनगरातील घटनेची आठवण
करमाडसारख्या शहरालगतच्या भागात बिबट्याचे सततचे दर्शन गंभीर आहे. कारण, यापूवी जुलै २०२४ मध्ये बिबट्या थेट छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवती भागापर्यंत, म्हणजेच प्रोझोन मॉल परिसरात पोहोचला होता. उल्कानगरीतून आ-लेला हा बिबट्या मॉलच्या पार्कगिंजवळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. मॉलजवळ बिबट्या आढळल्याने शाळा महाविद्यालयांना सुटी द्यावी लागली होती. तो बिबट्या सुरक्षित पकडण्यात वन विभागाला यश आले नव्हते.