Chhatrapati Sambhaji Nagar Leopard Cub Rescued | घुसूर तांड्यात विहिरीत पडलेल्या बिबट पिल्लाची सुखरूप सुटका

वन विभागाची तत्परता; तीन दिवसांत विहिरीत बिबट्या पडण्याची दुसरी घटना
Kannad Leopard Cub Rescued
Kannad Leopard Cub RescuedPudhari
Published on: 
Updated on: 

Kannad Leopard Cub Rescued

कन्नड : तालुक्यातील घुसूर तांडा शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट पिल्लाची वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप सुटका केली. मंगळवारी (दि. १३) सकाळी ही घटना उघडकीस आली. पिल्लाला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

घुसूर तांडा शिवारातील गट क्रमांक २३ मधील अनिल हरिदास चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत बिबट पिल्लू पडल्याची माहिती मंगळवारी सकाळी वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांनी वनकर्मचारी आणि वन्यजीव बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पिंजऱ्याच्या साहाय्याने पिल्लाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Kannad Leopard Cub Rescued
Chhatrapati Sambhaji Nagar Fire | कुंजखेड्यात गोठ्याला भीषण आग; शंकरपटातील तीन बैल गंभीररीत्या भाजले

वन विभागाच्या पथकाची तत्परता

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वनविभागाचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने आणि सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांच्या नेतृत्वात बचाव मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत चिकलठाण परिमंडळाचे वनपाल अण्णा वाघ, वनरक्षक सोमीनाथ वाघ, हरिश्चंद्र वाघ, रवींद्र गायकवाड, राम जाधव, दीपाली साळवे, वनसेवक अशोक आव्हाड, गोविंद चव्हाण, संरक्षण मजूर राजाराम मधे, संदीप शहारे आणि वाहनचालक सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस पाटील आशिष चव्हाण यांच्यासह राहुल चव्हाण, अजय चव्हाण, राजू चव्हाण, सोहम राठोड, अर्जुन राठोड, बळीराम चव्हाण आणि विजय चव्हाण या स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात सहकार्य केले.

Kannad Leopard Cub Rescued
Chhatrapati Sambhaji Nagar News : पाडापाडीनंतर रस्त्यांसाठी मनपाला हवे 2 हजार कोटी

तीन दिवसांत दुसरी घटना; वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

तालुक्यातील आडगाव येथे १० ऑक्टोबर रोजी मादी बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत घुसूर तांडा शिवारात बिबट पिल्लू विहिरीत पडल्याची दुसरी घटना समोर आली आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात विहिरींकडे येत असावेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उघड्या विहिरी वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेतातील विहिरींना संरक्षक कठडे बांधून वन्यप्राणी विहिरीत पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून बचावकार्य करण्याऐवजी तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. तसेच, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखून बचाव पथकाला सहकार्य करावे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news