

सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणात घर ाणेशाहीवर नेहमीच टीका होते. परंतु आता ही घराणेशाही महापालिकेच्या राजकारणातही उतरताना दिसत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सर्वच पक्षीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य सरसावले आहेत. अगदी मंत्री, आमदार, खासदार यांनाही घरातील व्यक्तींसाठी महापालिकेची उमेदवारी हवी आहे.
त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सध्या भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मात्र त्यात सामान्य कार्यक्रमांप्रमाणेच नेत्यांची मुले, पत्नी, पुतण्या आदींनीही उड्या घेतल्या आहेत.
त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी संबंधित नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्या त्या भागात मागील काही वर्षांपासून तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या घरात हवे तिकीट
गुजरात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण या छत्रपती संभाजीनगरात राहतात. त्यांनाही उमेदवारी हवी आहे.
केणेकर, थोरात, शेख यूसूफ यांनाही हवीत तिकिटे
भाजपचे आमदार संजय केणेकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन केणेकर, शिव-सेना उबाठाचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पुतणे अभिजित थोरात, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांचा मुलगा यांनाही उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पालकमंत्री संजय शिरसाट
शिवसेनेचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट आणि भाऊ असे दोघे महापालिकेसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळविण्याचा शिरसाट यांचा प्रयत्न आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋग्रीकेश खैरे हे क्रांती चौक प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तसेच खैरे यांचे पुतणे सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागातून तयारी करत आहेत. या दोघांनाही तिकीट मिळावे यासाठी खैरेंचा प्रयत्न आहे.
खासदार डॉ. भागवत कराड
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड हे कोटला कॉलनी भागातून इच्छुक आहेत. कराड यांच्या बहीण डॉ. उज्ज्वला दहिफळे यज्ही निवडणुकीची तयारी करत आहेत
आमदार प्रदीप जैस्वाल
शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे गुलमंडी येथून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या उमेदवारीचा विषय आमदार जैस्वाल यांनी प्रतिष्ठेचा केला आहे.
किशनचंद तनवाणी शिवसेनेचे माजी आमदार
किशनचंद तनवाणी यांच्या कुटुंबातूनही दोन जण निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. भाऊ राजू तनवाणी यांना सिंधी कॉलनी भागातून तर मुलगा चंदू तनवाणी यांना गुलमंडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी किशनचंद तनवाणी इच्छुक आहेत.
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
शिवसेना उवाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनाही आपले भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. राजेंद्र दानवे हे अजबनगर भागातून निवडणुकीची तयारी करत आहेत.