Sambhajinagar viral video : क्रांती चौकात 'चिरीमिरी' घेणारा वाहतूक पोलिस कॅमेऱ्यात कैद

दोन व्हिडिओ व्हायरल; त्या कर्मचाऱ्याची मुख्यालयात रवानगी
Traffic police bribery
पैसे घेताना वाहतूक शाखेचा अंमलदार.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एका शहरातील गजबजलेल्या क्रांती चौक सिझल परिसरात वाहतूक पोलिसाने वाहनचालकांकडून पैसे घेऊन, कोणतीही कागदपत्रे न तपासता दुचाकी सोडून दिल्याचा व्हिडिओ सोमवारी (दि.१३) व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर २० आणि ३२ सेकंदांचे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये चार वाहतूक शाखेचे अंमलदार चौकाच्या एकाबाजूला थांबलेले दिसत आहेत. त्यातील एक वाहतूक पोलिस कर्मचारी वाहनचालकांकडून उघडपणे पैसे स्वीकारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Traffic police bribery
Sambhajinagar Helmet Rule : शहरवासीयांच्या मानगुटीवर पुन्हा हेल्मेटचे भूत

चिरीमिरी दिल्यानंतर संबंधित वाहनांची कोणतीही कागदपत्रे किंवा परवाने न तपासता त्यांना बिनदिक्कतपणे पुढे सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र, तो व्हायरल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Traffic police bribery
CCTV camera : शहरात आता 'तिसऱ्या डोळ्या'ची करडी नजर

कसुरी अहवाल पाठवला, कारवाई करू- पैसे घेणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कसुरी अहवाल पाठवण्यात आला असून, त्याला सध्या मुख्यालयात अटॅच करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर पुढील कठोर कारवाई केली जाईल.

सुभाष भुजंग, सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news