किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी (दि.२८) निवडणुकीतून माघार घेतली.
छत्रपती संभाजीनगर
ठाकरेंच्या शिवसेनेला झटका; किशनचंद तनवाणी यांची माघार
Maharashtra Assembly polls | Kishanchand Tanwani : शिंदेंच्या उमेदवाराला समर्थन देण्याचा निर्णय
छत्रपती संभाजनगर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एक दिवस बाकी आहे. त्यातच शिवसेना उबाठा गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातून मध्य विधानसभेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी (दि.२८) निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी एमआयएमचा उमेदवार विजयी होऊ नये, यासाठी आपण माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.
तनवाणी यांनी आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत ठाकरे गटाकडून कुठलेही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता ठाकरे गट दुसरा उमेदवार देणार की याठिकाणी कोणीही लढणार नाही याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

