Nanded Sand Mining Raid : गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड पोलिसांची धडक कारवाई

जिलेटिनच्या कांड्यांनी ब्लास्ट करून लोखंडी बोटी जागीच केल्या नष्ट
Nanded Sand Mining Raid
Nanded Sand Mining Raidpudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेला बेकायदेशीर रेती उपसा आणि शासनाचा महसूल बुडवून होणारी चोरटी वाहतूक रोखण्यासाठी नांदेड पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. मुदखेड व उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली, महाटी, माळकौठा, सितानदी नाला, कामळज आणि चिलपिंपरी परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये ५ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यातील बहुतांश साहित्य जागीच नष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजणे, शाम पानेगावकर आणि परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक वैभव पडवळ यांच्या नेतृत्वात मुदखेड पोलिस ठाण्याचे पथक, स्थानिक गुन्हे शोध शाखा, क्यूआरटी आणि आरसीपी पथकाने नदीपात्रातील रेती उपसा केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकले. या प्रकरणी रेती माफिया, चालक आणि वाहनमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Nanded Sand Mining Raid
Nanded Crime : ११ दिवसांत १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अपर पोलिस अधीक्षक संदीप जाधव आणि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश कराड, पोलिस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, खंडू दर्शने, सय्यद, शिंदे यांच्यासह मुदखेड, उस्माननगर, क्यूआरटी व आरसीपीच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. पर्यावरणाचा ऱ्हास आणि महसूल बुडविणाऱ्यांविरुद्ध अशीच धडक मोहीम यापुढेही सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Nanded Sand Mining Raid
Psychology Eye Closure Effect: काही आठवत नसेल तर आपण डोळे का बंद करतो? मानसशास्त्राने सांगितले यामागचे रंजक कारण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.