Khultabad road accident : खुलताबाद बाह्यमार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

एक ठार, एक गंभीर, दोघे किरकोळ जखमी
Khultabad road accident
अजित बनकरpudhari photo
Published on
Updated on

खुलताबाद : शहरातील (बायपास) बाह्यमार्गावरील न्यायालयासमोर छत्रपती संभाजीनगर-वेरूळ महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.13) रात्री घडली. अजित अन्ना बनकर (20, रा. सुलिभंजन, ता. खुलताबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास एक दुचाकी सुलिभंजन येथून खुलताबादच्या बाह्यमार्गाने वेरूळकडे जात होती, तर दुसरी दुचाकी वेरूळहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. दरम्यान, दोन्ही चालकांना एकमेकांचा अंदाज न आल्याने समोरासमोर जोरदार धडक झाली.

Khultabad road accident
Yavatmal Accident : बिजोरा टोल नाक्यावर मद्यधुंद ट्रकचालकाचा भीषण थरार; दोन किन्नरांसह १० जण गंभीर जखमी

या भीषण अपघातात अजित बनकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अप्पाराव घुसळे, शुभम घुसळे (रा. सुलिभंजन) तर खुलताबाद शहरातील सय्यद सावेज हे तिघे जखमी झाले. या तिघांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Khultabad road accident
अज्ञात वाहनाला कार धडकली, चालकाचा मृत्यू, तीन जण जखमी

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news