अज्ञात वाहनाला कार धडकली, चालकाचा मृत्यू, तीन जण जखमी

धुळे-सोलापूर महामार्गावर जांभळा गावाजवळ अपघात
sambhajinagar news
अज्ञात वाहनाला कार धडकली, चालकाचा मृत्यू, तीन जण जखमीfile photo
Published on
Updated on

Car Collides with Unidentified Vehicle; Driver Dies, Three Injured

दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा :

अज्ञात वाहनाला कारने मागून जोरदार धडक दिल्याने कार चालकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर महामार्गावर जांभळा गावाजवळ रविवारी (दि.५) पहाटे २.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

sambhajinagar news
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

या अपघातात अतुल बायगा (२५, रा. सेंदवा, जि. वडवाणी, मध्य प्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. तर करण चव्हाण (२६), राहुल यादव (२९) आणि लकी रमेश (२२, सर्व रा. सेंदवा, जि. वडवाणी, मध्य प्रदेश) हे तिघे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुण मारुती स्विफ्ट कारने (एम पी ०९ सीएफ ७०५६) वडवाणी (मध्य प्रदेश) येथून बारामतीकडे जात होते. दरम्यान, जांभळा गावाजवळ अज्ञात वाहनाला कारने मागून जोराची धडक दिली. अपघातात कारमधील चारही जण जखमी गावातील झाले. ग्रामस्थांनी जांभळा तात्काळ मदत करत जखमींना जगद्वरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्था यांच्या रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी अतुल बायगा याला मृत घोषित केले. दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar news
Jalna gutkha seizure : ट्रकमधून जाणारा 21 लाखांचा गुटखा जप्त

ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण जखमी दौलताबाद : छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद महामार्गावर अब्दीमंडी गावाजवळ शनिवारी (दि. ४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाले. जखमींमध्ये ऋतिक विलास सुडा (१६) व राहुल प्रेमचंद राठोड (१६, रा. रामपुरी तांडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

ऋतिक व राहुल हे दोघे दुजाकीने (एमएच २० सीएफ १०२८) रामपुरी तांडा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान, समोरून दौलताबादकडे येणाऱ्या ट्रकने (एमएच १८ बीझेड ५७५५) अब्दीमंडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news