Chhatrapati Sambhajinagar Accident : लाडगावजवळ पहाटे अपघात; ५० प्रवासी बालंबाल बचावले !

दुभाजकावरील ७० फूट लोखंडी रेलिंग तोडून ट्रॅव्हल्स विरुद्ध दिशेला; झाडाला धडक, एक जण गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar Accident
लोखंडी दुभाजक तोडून रस्त्याच्या विरूध्द दिशेला येऊन वृक्षाला धडकेलेली भरधाव ट्रॅव्हल्स.pudhari photo
Published on: 
Updated on: 

करमाड: नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे सुमारे ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गुरुकृपा ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी (दि. २७) पहाटे साडेतीनच्या सुमारास लाडगावजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅव्हल्स महामार्गाच्या दुभाजकावरील सुमारे ७० फूट लांबीचे लोखंडी रेलिंग तोडून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. त्यानंतर सुमारे १०० फूट अंतरावर रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक दिली.

या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, अन्य काही प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, यावेळी समोरून एखादे वाहन आले असते तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

Chhatrapati Sambhajinagar Accident
Sambhajinagar Municipal Corporation Recruitment : मनपा भरती प्रक्रियेवर एमआयएमचा आक्षेप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुकृपा ट्रॅव्हल्स (क्र. सीजी ०८ बीएफ ३६००) नागपूरहून जालना महामार्गाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. शुक्रवारी पहाटे लाडगावजवळील वळणावर चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स महामार्गाच्या दुभाजकावर असलेल्या लोखंडी रेलिंगवर जोरात आदळली. धडकेची तीव्रता एवढी होती की, सुमारे ७० फूट रेलिंग तोडून ट्रॅव्हल्स दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. त्यानंतर सुमारे १०० फूट पुढे जाऊन रस्त्यालगतच्या झाडाला धडकली.

या भीषण धडकेत ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची करमाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रशांत नांदवे व संजय सपकाळ पुढील तपास करीत आहेत.

महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

महामार्गाच्या दुभाजकावरील लोखंडी रेलिंग तोडून प्रवासी ट्रॅव्हल्स थेट विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुभाजकावरील सुरक्षा यंत्रणा कितपत सक्षम आहे, तसेच वळणाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना आहेत का, याची तपासणी करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली.

Chhatrapati Sambhajinagar Accident
Ranganubhuti Theatre Festival: कलाकारांचा आत्मा एकच; ‘रंगानुभूति’ नाट्य महोत्सवात प्रयोगकर्मींचा सन्मान

नागरिकांची मदत; एक जण गंभीर

अपघाताचा मोठा आवाज ऐकून लाडगाव येथील नागरिकांनी घराबाहेर येत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, अन्य जखमींनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

समोरून वाहन आले असते तर मोठा अनर्थ !

दुभाजक ओलांडून ट्रॅव्हल्स विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली, त्यावेळी समोरून एखादे वाहन आले असते तर समोरासमोर भीषण धडक होऊन मोठी जीवितहानी झाली असती. मात्र, पहाटेची वेळ असल्याने त्या मार्गावर समोरून कोणतेही वाहन आले नाही. त्यामुळे सुमारे ५० प्रवाशांच्या जीवावर बेतलेले संकट टळले. काही क्षणांच्या अंतराने काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी परिस्थिती या अपघातातून समोर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.