Crime News : कन्नड न. प. मुख्यधिकाऱ्यांना भरचौकात अडवून मारहाण

निवडणूक कामात अडथळा, पोलिसांत गुन्हा दाखल
sambhajinagar crime news
Crime News : कन्नड न. प. मुख्यधिकाऱ्यांना भरचौकात अडवून मारहाणFile Photo
Published on
Updated on

Kannad Municipal Council Chief Officer intercepted and assaulted in the middle of the town square.

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक कर्तव्यावर असलेल्या नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना भरचौकात अडवून शासकीय वाहनातून बाहेर ओढत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मुख्यधिकारी रवींद्र शिवाजी लांडे यांच्या जबाबावरून ग्रामीण पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar crime news
विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री बोर्डीकर

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र लांडे हे कन्नड नगर परिषदेत मुख्यधिकारी म्हणून कार्यरत असून, भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये त्यांची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्याबाई होळकर सभागृहात आयोजित 'स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन' कॅम्पचे काम आटोपून ते सायंकाळी पाचच्या सुमारास कर्मचारी संजय शिरसाठ यांच्यासोबत शासकीय वाहनाने निघाले होते.

वाहन चाळीसगाव रोडवरील हमीद चौकात आले असता संशयित आरोपी प्रदीप सीताराम अल्हाट, पंकज सुरदसे, त्याची आई व बहीण व इतर काहींनी वाहन अडविले. वाहनाचा दरवाजा उघडून मुख्यधिकाऱ्यांना बाहेर ओढले आणि "तू आमच्या नातेवाइकांचे पगार का रोखतो?" असे म्हणत शिवीगाळ व धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली.

sambhajinagar crime news
Nanded Crime : वसुलीसाठी कर्जदारांचे अपहरण करून कार्यालयात डांबले

यावेळी सोबत असलेले कर्मचारी संजय शिरसाठ व प्रत्यक्षदर्शी अब्दुल जफर यांनी मुख्यधिकाऱ्यांची त्यांच्या तावडीतून सोडवणूक केली. शासकीय निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांत रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news